Dombivli ; मोटारसायकल चोऱ्यांचा सपाटा
डोंबिवली दि.२६ :- कल्याण-डोंबिवलीत मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच असून सोमवारी एकाच दिवशी डोंबिवलीत तीन मोटारसायकल चोरीच्या घटना घडल्या आहेत. डोंबिवली जवळील पिसवली येथील श्रीमंत बंगला येथे राहणारे संजय अमृत पाटील यांनी आपली मोटारसायकल राहत्या घराखाली पार्क केली असता चोरीला गेली.
हेही वाचा :- मुंबई-पुणे एक्सप्रेस वेची टोल दरवाढ ; १ एप्रिलपासून अशी असेल दरवाढ.
याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या घटनेत डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रोडवरील नव नीलकंठ प्लाझा इमारतीत राहणाऱ्या रहिवाशाने आपली मोटारसायकल सुभाष रोडवरील प्रेरणा बिल्डींगजवळ पार्क केली असता चोरीला गेली.
हेही वाचा :- ‘भाई का म्हणत नाही’असा जाब विचारत तरुणावर कोयत्याने वार
याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार विष्णूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिसऱ्या घटनेत ठाकुर्ली येथील मंगेशी डझालमध्ये राहणाऱ्या 29 वर्षीय तरुणाने आपली मोटारसायकल ठाकुर्ली स्टेशनजवळ रस्त्यावर पार्क केली असता चोरीला गेली. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार डोंबिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.