डोंबिवली ; मोबाईल लंपास
डोंबिवली दि.२२ – डोंबिवली पूर्वेकडील नेहरू रोड परशूराम सोसायटी मध्ये राहणारा मयूर भिडे हा विद्यार्थी काल रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील छेडा रोडच्या दिशेने पायी चालत जात होता. त्यावेळी महेश नावाच्या अनोळखी इसमाने त्याला हटकले. तू माझ्या मैत्रिणीला मसेज का पाठवतोस, असे खोटे आरोप करत या इसमाने भिडे याच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.
हेही वाचा :- डोंबिवली ; महिला चोर अटकेत
त्याला बोलण्यात गुंतवत तुझा मोबाईल पाहण्यासाठी घेऊन जातो व मैत्रिणीला घेऊन येतो असे सांगत मोबाईल घेऊन निघून गेला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर भिडे याने या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
Please follow and like us: