डोंबिवली-कोपर दरम्यान लोकलमधून पडून तरुणीचा बळी
डोंबिवली दि.१७ :- लोकलमध्ये गर्दी असल्याने दरवाज्याला लटकून प्रवास करताना तोल जाऊन एका २२ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान सकाळी पावणे नऊच्या सुमारास घडला वाढती गर्दी व अपुऱ्या लोकल यामुळे रेल्वे अपघातात मृत्यू पावणार्याची संख्या वाढत आहे गेल्या ११ महिन्यात ११५ पेक्षा जास्त बळी गेले आहेत.
हेही वाचा :- कल्याण मध्ये “राष्ट्र कल्याण पार्टी” ची स्थापना
चार्मी पासड (२२) असे रेल्वे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. डोंबिवली पूर्वेकडील देसलेपाडा येथील भोपर गावातील नवनीतनगर येथे राहत होती. चार्मीने डोंबिवली रेल्वे स्थानकातून ८:५३ ची मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जलदगतीच्या रेल्वेगाडी पकडली. रेल्वेगाडीत आत जाण्यास जागा नसल्याने तिला दरवाज्याला लटकून प्रवास करावा लागला. रेल्वे गाडीने डोंबिवली रेल्वे स्थानक सोडल्यानंतर काही अंतरावर जाताच तिचा तोल जाऊन खाली पडली.
हेही वाचा :- ‘छे..छे..झुकली रे झुकली, मराठी बाणा सांगणारी सेना झुकली!’
यात तिचा जागीच मृत्यू झाला. डोंबिवली लोहमार्ग पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी धावत गेले.चार्मी ब्युटीपार्लरचा कोर्स करण्यासाठी घाटकोपर येथे जात होती.याआधी भावेश नकाते, धनश्री गोडसे हेही लोकलच्या गर्दीने रेल्वेगाडीतून पडून मृत्यू झाला होता. रेल्वे प्रशासनाने डोंबिवलीतील वाढत्या प्रवाश्यांची संख्या पाहता यावर लवकरात उपाययोजना कराव्यात अशी प्रवाश्यांकडून मागणी होत आहे.