डोंबिवली ; महिला चोर अटकेत
डोंबिवली दि.२२ – कल्याण पूर्व काटे मानवली परिसरात राहणारी महिला काल दुपारी आपल्या मैत्रिणीसह कोळसेवाडी येथील स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शन घेतल्यानंतर मंदिराला फेऱ्यामारण्यासाठी त्यांनी आपली बॅग मंदिरासमोरील सभा मंडपाच्या ओट्याखाली ठेवून मंदिरास प्रदक्षिणा घालण्यास निघून गेल्या असता.
हेही वाचा :- याकूब फाशीला विरोध करणारे नसिरुद्दीन ‘स्लीपर सेल’ ?
त्या ठिकाणी बसलेली लता अहिरे या महिलेने यांच्या पर्स मधून रोकड काढण्याचा प्रयत्न केला मात्र ही बाब या महिलेच्या लक्षात आली. तिने लताहिला रंगेहाथ पकडून कोळशेवादी पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी कोळशेवादी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी लता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Please follow and like us: