डोंबिवली ; पैशांच्या वादातून भावावर चाकूने हल्ला
डोंबिवली दि.१० – ठाणे दिवा येथे राहणारा नितीन राउळ शुक्रवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास डोंबिवली महात्मा फुले रोड येथे राहणाऱ्या आपला भाऊ प्रवीण राउळ या भावाच्या घरी आला होता. त्याने वहिनीला व पुतण्याला आल्या आल्या वडिलांनी आपल्या नावावर ठेवलेल्या एफडीबाबत विचारले. याच दरम्यान त्यांचा मोठा भाऊ प्रवीण घरी आला.
हेही वाचा :- डोंबिवली मधील कंपनीतून लाखोंचा मुद्देमाल लंपास
त्याने तू माझ्या बायका मुलांना का त्रास देतोस असे सांगत वाद घालत चाकूने नितीन याच्या पोटावर हल्ला केला. या हल्ल्यात नितीन जखमी झाला असून या प्रकरणी विष्णू नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी प्रवीण राउळ विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
Please follow and like us: