Dombivali ; पुन्हा लोकलमधून पडून तरुण जखमी

डोंबिवली दि.१८ :- गेल्याच महिन्यात डोंबिवलीजवळ लोकलमधून पडून एका तरुणीचा मृत्यू झाला होता. या घटनेत चार्मी प्रसाद या २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला होता. १६ डिसेंबरला ही घटना घडली होती. आता पुन्हा लोकलमधून तरुण पडल्याची घटना घडल्याने प्रवासी आणखी संतापले आहेत. डोंबिवलीमध्ये लोकलमधून पडून एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडलीय. ही घटना सकाळी पावणे दहाच्या सुमारास घडली. या घटनेत विशाल पांडरंग गुरव हा तरुण जखमी झाला आहे.

हेही वाचा :- ४० वी राष्ट्रीय मास्टर्स अॉथलेटीक्स चांम्पीयन शीप संपन्न

डोंबिवलीच्या आझदे गावातील विशाल गुरव हा ३१ वर्षीय तरुण सकाळी ९.४० च्या सुमाराला धावत्या लोकलमधून खाली पडला. डोंबिवलीजवळच्या 47/25 या खांबाजवळ तो पडला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ शास्त्री नगर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. विशालने जखमी असताना फोन करून भावाला कळवलं. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email