डोंबिवलीत गॅस वितरकांची दादागिरी, गॅस पुरवठा खंडित करण्याची धमकी

डोंबिवली दि.२८ – डोंबिवली परिसरात सुमार १ लाख २० हजार घरगुती गॅस धारक आहेत व १२ वितरक गॅस वितरणाचे काम करतात. यापैकी काही गॅस वितरकांचे कर्मचारी घरातील एकटी महिला बघून गॅसचा सुरक्षा पाईप तातडीने बदलण्याची धमकी देतात व न केल्यास गॅस पुरवठा खंडित करण्याची धमकी देत असल्याची तक्रार आहे. एका ठिकाणी तर पाईप बदलण्यास नकार दिला म्हणून गॅस सिलेंडरच उचलून नेल्याची घटना घडली आहे. गॅस वितरकांच्या दादागिरीमुळे ग्राहक उघडपणे बोलण्यास तयार नाही. गॅस कंपनी घरगुती सिलेंडरसाठी जो सुरक्षा पाईप लाईन बसवते. त्याची पाच वर्षांची मुदत असते व दर दोन वर्षानी तो पाईप तपासणी करुन धेणे ग्रहकांच्या दृष्टीने फायद्याचे आहे. एखाद्या ग्राहकांने गॅस पाईप बदलण्यास व तपासण्यास नकार दिला तर वितरकाना तशी मनमानी करता येत नाही.

हेही वाचा :- डोंबिवली ; बुलेट ट्रेनवर सव्वा लाख करोड रुपये खर्च करण्यापेक्षा इथल्या समस्या सोडवा

पण डोंबिवलीत अशी धटना घडत असून यामुळे नक्की नियम काय असा सवाल विचारला जात आहे. शिवाय या पाईपची अधिकृत किंमत १७७ रुपये असताना कर्मचारी चारशे पाचशे रुपयांची मागणी करुन लूट करत असल्याच्याही तक्रार आहेत. मात्र दर पाच वर्षांनी जरी सुरक्षा पाईप बदलणे आवश्यक असले तरी काही ग्राहकांनी २००५ मध्ये सुरक्षा पाईप बसवला पण काही होत नाही असे समजून तो बदलण्यास नकार दिला जात आहे यासंदर्भात ठाणे रायगड जिल्हयाचे गॅस सघटनेचे सचिव अतुल देसाई यांना विचारले असता. त्यांनीही जर एखाद्या ग्राहकांनी सुरक्षा पाईपची तपासणी केली नाही तर गॅस कोणत्याही कारणांने बंद करता येणार नाही असे सांगीतले. मात्र दोन वर्षानी पाईप तपासून घेणे हे गॅस धारकांच्या हिताचे असल्याचे त्यानी निदर्शनाला आणले. मात्र यासाठी जबरदस्ती नको असा सल्ला त्यांनी दिला.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email