डोंबिवलीच्या मॅरेथॉन लाईफ सेव्हर रनमध्ये धावले 300 स्पर्धक
Hits: 0
डोंबिवली दि.२७ – इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डोंबिवली शाखेतर्फे डोंबिवलीमध्ये रविवारी प्रजासत्ताकदिनी लाईफ सेव्हर रन 2020 मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 6 वाजता उत्साहाने ही स्पर्धा सुरू झाली. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवलीतील हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल ते मिलापनगर उद्यान आणि पुन्हा क्रीडा संकुलापर्यंत 2 आणि 3 किमी आणि टिळकचौकाला वळसा घालून क्रीडा संकुलापर्यंत 5 किमी यानुसार या मॅरेथॉनचा मार्ग आखलेला होता. यावेळी जवळपास 300 हून अधिक स्पर्धकांनी व प्रेक्षकांनी भाग घेतल्याने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
हेही वाचा – डोंबिवली एमआयडीसी मधील कारखाने सेफ्टी ऑडिट शिवाय सुरू, प्रकरण दडपण्याचा माजी मंत्र्यांचा प्रयत्न
युवा वर्गाच्या बरोबरच अनेक ज्येष्ठ नागरिक व कर्करोगावर मात केलेले नागरिक देखील जोशाने सामील झाले होते. स्पर्धेची सांगता पुरस्कार वितरण आणि हृदयाचे आरोग्य कसे जपावे, याचा संदेश देणाऱ्या सुंदर संगीतनाट्याने झाली. त्याला उपस्थित स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पुरस्कार वितरण डॉ मंगेश पाटे, डॉ. ओक, डॉ. भसीन यांच्या हस्ते झाले. विजेत्या स्पर्धकांचे त्यांनी अभिनंदन केले आणि सहभागी सर्व स्पर्धकांना पुढील वर्षीसाठी प्रोत्साहन दिले.
उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी हृदयरोग आणि घेवयाची काळजी या विषयावर उपस्थित स्पर्धक आणि प्रेक्षकांना संबोधित केले. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डोंबिवली शाखेतर्फे प्रत्येक वर्षी ही मॅरेथॉन आयोजित करण्यात येते. जनतेमध्ये आरोग्याविषयी जागरुकता निर्माण करणे हा या मॅरेथॉन आयोजित करण्यामागचा उद्देश असतो.
हेही वाचा – आमच्या आरत्याचा जर त्रास होत नसेल तर तुमच्या मशिदींवरच्या भोग्यांचा आम्हाला त्रास का…?
या वर्षीची थीम बी हार्ट हेल्थी अशी होती. समाजात हृदयाच्या आरोग्याविषयी आणि विशेषत: तरुण पिढीतील समस्यांविषयी जनजागृती निर्माण व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे. ही मॅरेथॉन आयएमएच्या डोंबिवली अध्यक्षा डॉ. मीना पृथी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सचिव डॉ. विजयालक्ष्मी शिंदे, डॉ. वंदना धाकतोडे, डॉ. अर्चना पाटे, डॉ. नीती उपासनी आदींच्या सहकार्याने पार पडली. स्पर्धा संपल्यानंतर अनेक स्पर्धकांनी विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी स्पर्धेच्या आयोजनाचे आणि दिलेल्या संदेशाचे कौतुक केले. त्यांच्या या उत्साहामुळे सर्वच आयएमएच्या आयोजकांना वारंवार अशा स्पर्धा आयोजित करण्याचा उत्साह व बळ मिळाले आहे. भविष्यात अशाप्रकारे समाजप्रबोधनासाठी विविध कार्यक्रमांचे नियोजन केले होते. यावेळी आयएमएच्या डोंबिवली शाखेने सर्व स्पर्धक, प्रेक्षक आणि उपस्थित सहकाऱ्यांचे आभार मानले.