Dombivali ; लसूण-नारळावर चोरट्यांचा डल्ला

डोंबिवली दि.१२ :- महागाईने नागरिकांचे कंबरडे मोडले असतानाच चोरट्यांनी आता आपला मोर्चा रोजच्या आहार वजा स्वयंपाकात लागणाऱ्या वस्तूंकडे वळविल्याचे एका घटनेतून निष्पन्न झाले आहे. कल्याणमध्ये चोरट्यांनी चक्क लसूण व नारळाच्या गोण्या चोरून नेल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे.

हेही वाचा :- हिंदुत्ववादी शिवसेनेची गोची…

कल्याण पश्चिमेकडे असलेल्या जुन्या आरटीओजवळ जय बजरंग अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या देवीचंद भनगडे यांचे कल्याण एएपीएमसी मार्केटमध्ये मे. हरिओम इंटरप्रायझेस नावाने लसूण आणि नारळ खरेदी-विक्रीचे दुकान आहे.

हेही वाचा :- कल्याणमध्ये मिळालेल्या अर्ध्या मृतदेहाला फुटली वाचा ऑनर किलिंगचा प्रकार उघड

सोमवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी सदर दुकानाचे शटर उचकटून त्यातील ५५ हजार रुपये किमतीचे १० गोण्या लसूण, साडेआठ हजार रुपये किमतीचे पाच गोण्या नारळ चोरून नेले. ही बाब मंगळवारी निदर्शनास आल्यानंतर व्यापारी भनगडे यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email