Dombivali ; लोकवर्गणीतून बालिकेच्या हृदयावर शस्त्रक्रिया 

Hits: 0

डोंबिवली दि.२८ :- डोंबिवली पश्चिममध्ये राहणारे रिक्षा चालक जितेंद्र माने यांची ४ वर्षांची कन्या प्रज्ञा हिच्या हृदयावरबी नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली. आर्थिक परिस्थिती नसल्याने कोपर येथील नागरिकांनी लोकवर्गणी जमा करून यासाठी झालेला २ लाख रुपये हॉस्पिटलमध्ये दिले. 

हेही वाचा :- “दहा रुपयांच्या थाळी सोबत वीस रुपयांची बिसलरी पिणारे गरीब माणूस”

मध्य रेल्वेचे अधिकारी संजय गुप्ता हे कोपर येथे रहातात व प्रज्ञाची आई त्याच्याकडे धुणी-भांडीचे काम करते. त्यांनी गुप्ता यांना ही गोष्ट सांगितली. या बालिकेवर ती ४ वर्षांची असताना कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये हृदयावर पहिली शस्त्रक्रिया झाल्याने दुसरी पण तिथेच करणे आवश्यक होते.

हेही वाचा :- शिवभोजन थाळी पहिल्याच दिवशी दहा हजार थाळी विक्री…

गुप्ता यांनी मित्र परिवार, हरी ओम भजन मंडळ, जैस्वाल समाज यांनी तातडीने आर्थिक मदत दिली व जमा झालेला निधी हॉस्पिटल मध्ये दिल्यानंतर नुकतीच त्या बालिकेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. तिची प्रकृती सुधारत आहे. कोपरवासियांनी वेगळा आदर्श यामुळे निर्माण केला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.