Dombivali ; शहरातील सामाजिक संस्थांनी मैदानांची जपणूक करावी – महापौर विनिता राणे

कल्याण दि.०९ :- कल्याण-डोंबिवली शहरातील संस्थानी मैदानात होणाऱ्या त्यांच्या सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमानंतर मैदानांची काळजी घेतली पाहिजे. काही वेळा मैदानात कार्यक्रम झाल्यानंतर मैदानांची अवस्था वाईट होते. कारण तरुणांसाठी व विद्यार्थ्यांसाठी मैदाने महत्वाची आहेत. मैदाने जपली तर त्याचा फायदा खेळाडूना निश्चित होईल. भविष्यात चांगल्या मैदानांमुळे मोठे खेळाडून निर्माण होवू शकतात. त्यामुळे सर्वानीच मैदानांची जपणूक केली पाहिजे, असे वक्तव्य कल्याण-डोंबिवली महानगरपालिका महापौर विनिता राणे यांनी डोंबिवलीत केले.

हेही वाचा :- फर्नीचरच्या शोरूम मध्ये घुसला भलामोठा अजगर कामगारांसह ग्राहकांची पळापळ

डोंबिवली पश्चिमेत भागशाळा मैदान येथे स्व. श्रीधर परशुराम म्हात्रे चषक 2020 अंडर आर्म सर्कल क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले होते. त्या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी महापौर राणे बोलत होत्या. यावेळी जेष्ठ नगरसेवक तथा माजी स्थायी समिती सभापती जनार्दन म्हात्रे, माजी नगरसेविका रेखा म्हात्रे, गुलाब म्हात्रे, राहुल म्हात्रे, सोपान पाटील, अभिजित थरवळ यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. तीन दिवस चालणाऱ्या या क्रिकेट स्पर्धेसाठी 32 संघांनी सहभग घेतला असून शुभारंभाचा सामना एस.पी.एस. इलेव्हन संच आणि डोंबिवली पॅकर्स यांच्यात झाला. महापौर विनिता राणे यांनी शुभारंभाचा पहिला चेंडू खेळण्याचा आनंद घेतला तर जनार्दन म्हात्रे यांनी एक ओव्हर फटकेबाजी करीत पूर्वीच्या क्रिकेट खेळाचा आनंद पुन्हा घेतला यावेळी राहुल म्हात्रे यांनी गोलंदाजी केली.

हेही वाचा :- जमीनवादातून डोंबिवलीत उडाला रक्तरंजित भडका २ जखमी, १२ पैकी तिघा हल्लेखोरांना अटक

या स्पर्धेत विजयी संघास 55 हजार 555 रोख आणि ट्रॉफी तर उपविजेता संघास 22 हजार 222 रोख आणि ट्रॉफी, त्याचबरोबर इतर बक्षिसे असून मॅन ऑफ द मॅच ला स्कुटी मिळणार आहे. तीन दिवस ही स्पर्धा होणार असून अंतिम सामना देखील होणार आहे. डोंबिवलीत होणाऱ्या या अंडरआर्म सर्कल क्रिकेट सामन्यासाठी क्रिकेट प्रेमींची गर्दी होत आहे. अंडर आर्म सर्कल क्रिकेट स्पर्धा यशस्वी होण्यासाठी डोंबिवली वॉरिअर संघटनेने विशेष मेहनत घेतली. तर मधुकर म्हात्रे, नरेश कदम, राहुल किर, केतकी पोवार, उषा आचरेकर, जाई पोवार (ढाले) यांचे सहकार्य मिळाले.

Hits: 46

Leave a Reply

Your email address will not be published.

RSS
Follow by Email