Dombivali ; पोलिसांचा पीडितेला धक्कादायक सल्ला ‘तो’ पुन्हा तुमच्याकडे आला की बोलवा !

डोंबिवली दि.१२ :- कल्याण पूर्वेत राहणारी एका पीडित महिला सुरक्षेसाठी डोंबिवलीतील टिळकनगर ठाण्यात गेली असता, पिडीतेलाच सांगितले. पुन्हा तो तुमच्याकडे आला तर आम्हाला बोलवा ! आम्ही येऊन त्याच्यवर कारवाई करू , असा पोलिसांनी धक्कादायक सल्ला दिल्याची घटना समोर आली आहे. या सल्ल्यामुळे पीडित महिलांसाठी सुरक्षेबाबतच्या असलेल्या पोलिसांच्या उपाययोजनांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित झाला आहे.

हेही वाचा :- Dombivali ; केअर टेकर म्हणून ठेवलेल्या महिलेने घर लुटले

हैद्राबाद, गुजरात , उत्तरपदेश , राजस्थान, झारखंड आदी राज्यात महिलांवर अत्याचार करून पीडितांची हत्या करण्यात आल्याची घटना ताज्या असतानाच, कल्याण पूर्वेतील कचोरे गावात राहणाऱ्या पीडित महिलेला पोलिसांच्या हलगर्जीपणाचा संताप आला. या पीडित महिलेला काही दिवसापासून एक विकृत तरुण तिचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास देत आहे. हा विकृत एवढ्याच थांबला नाही तर त्याने पीडित महिलेचे घर गाठत महिलेच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करीत अश्लील प्रकार सुरु करून मै आपसे प्यार करता हू ! *आप मुझे आपका नंबर दो, मै आपका कितने दिनोसे पिच्छा कर रहा हू* ! *मै आपको पाकर रहुगा* असे बोलताच पीडित महिलेने त्याची कॉलर पकडून मारण्याच्या प्रयत्न केला असता, आपने मेरे कॉलर पे हाथ डाला हे मै आपको सर्वेदय मॉलके सभी बच्चो के हात से इसाब उतार के राहूगा, अशी धमकी देत, पीडितेसोबत धक्काबुक्की केली.

हेही वाचा :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या 63 व्‍या महापरिनिर्वाण दिनानिमित्‍त आदरांजली

यामुळे पीडित महिलेने आरडाओरडा केल्याने त्याने घाटनास्थळावरून पळ काढला. त्यांनतर अचानक घडलेल्या घटनेमुळे महिला भयभीत होऊन तिने पोलिसांच्या १०० डॉयल नंबरवर संपर्क करून माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र फोन लागला नाही. त्यामुळे महिलेने झालेल्या घटनेची माहिती देण्यासाठी व संरक्षणसाठी स्थानिक टिळकनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र ठाणे अंमलदार यांनी पीडित महिलेच्या घटनेची दखलपात्र गुन्हा नोंद करून आरोपीचा शोध घ्यायचा सोडून महिलांची उलट तपासणी करून घरी परत पाठवले.

हेही वाचा :- जलवाहतूक योजनेत शासनाची दिरंगाई खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उठवला आवाज

ठाणे अंमलदार यांनी प्रथम अहवाल खबर नुसार गुन्हा न नोंदविता त्यांनी कलम ५०६ नुसार अदखलपात्र गुन्हा नोंदविला. शिवाय पीडित महिलेला सांगितले कि, तुम्हीच आरोपीला शोधून आणा. किंवा त्याने अगर पुन्हा संर्पक केला तर आम्हाला घटनास्थळी बोलवा असे म्हणून मला घरी जाण्याचा त्या पोलिसांनी सल्ला दिला. त्यामुळे पीडित महिला भयभीत होऊन तिने प्रसारमाध्यांकडे धाव घेऊन आपली व्यथा मांडली .

हेही वाचा :- हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील चार आरोपींयांच्या एनकाउंटर

दरम्यान पाच दिवसापूर्वीच हैद्राबादमध्ये अत्याचार करून पीडितेला जिवंत जाळल्याची भयानक घटनेमुळे कल्याण पोलीस उपायुक्तांनी सर्वच पोलीस ठाण्यातील अधिकारी – कर्मचाऱ्यांनी महिलांवर होणारे अत्याचार कशे रोखले जातील याविषयी बैठक घेऊन मार्गदर्शन केले होते. मात्र संबधित पोलिसांनी याचा बोध घेतला नसल्याचे या घटनेवरून समोर आले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email