Dombivali ; पेट्रोल टँकरचा उडाला भडका कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मानवी वस्ती बचावली

Hits: 0

डोंबिवली दि.२८ :- डोंबिवली पश्चिमेकडे आलेल्या एकविरा पेट्रोल पंपाजवळ पेट्रोल घेऊन आलेल्या टँकरला आग लागल्याची घटना बुधवारी सकाळच्या सुमारास घडली. मात्र अत्यंत ज्वालाग्राही इंधन असलेल्या पेट्रोलचा अधिक भडका उडू नये यासाठी कर्मचाऱ्यांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी सतर्कता दाखविल्याने आसपासची मानवी वस्ती थोडक्यात बचावली. पश्चिम डोंबिवलीत एकविरा नावाने पेट्रोल-डिझेलचा पंप उभारण्यात आला आहे. या पंपाला हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीमार्फत इंधन पुरविले जाते.

हेही वाचा :- कल्याण-डोंबिवलीतही चालते वेठबिगारी ६ अल्पवयीन कामगारांची सुटका

बुधवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास एम एच 43 / बी बी / 2377 क्रमांकाचा टँकर नवी मुंबईतून पेट्रोल घेऊन डोंबिवलीत दाखल झाला. उमेशकुमार गौतम याचे नियंत्रण सुटल्यामुळे हा टँकर तेथिल एका इलेक्ट्रिकच्या पोलवर आदळला. परिणामी या पोलवरील तारा तुटल्याने ठिणग्या (स्पार्क) उडाल्या. या ठिणग्यांचा अत्यंत ज्वालाग्राही इंधन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेट्रोलशी संपर्क आला. त्यामुळे टँकरला आग लागली. मात्र टँकरवर असलेली झाकणे बंद असल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरली नाही. जीव वाचविण्यासाठी टँकर चालक उमेशकुमार याने पळ काढला. बघ्यांनी आरडाओरडा केल्यानंतर पंपावरील कर्मचारी धावून आले. त्यांनी पंपावर उपलब्ध असलेल्या आग विरोधी यंत्रणेच्या साह्याने टँकरवरील आग विझवण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा :- झोमॅटोवर जेवण मागविणे पडले महागात तरुणाला ४९.१६० हजारांचा गंडा

तोपर्यंत ह वॉर्डच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या जवानांनी भडकलेली आग काही वेळातच आटोक्यात आणल्याचे फायर फायटर सुधीर दुशिंग यांनी सांगितले. ते म्हणाले, इलेक्ट्रिक पोलवर असलेल्या तारा तुटून टँकरवर पडल्याने त्यावर साचलेल्या पेट्रोलने पेट घेतला. दरम्यान अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश असल्याने मोठा अनर्थ टळला आहे. अन्यथा 2 किलोमीटरचा परीघ जळून खाक झाला असता. या घटनेनंतर भर लोकवस्तीत सुरू केलेला हा इंधन पंप वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.