Dombivali ; प्रेमसंबंधाची माहिती देण्याच्या संशयावरून युवकाची हत्या
Hits: 0
डोंबिवली दि.२५ :- मुलीच्या वडिलांना आपल्या प्रेमसंबंधाची माहिती देण्याच्या संशयावरून मोठा गाव ठाकुर्ली भागात एका युवकाची हत्या करण्यात आली. या प्रकरणात विष्णू नगर पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. विष्णू नगर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी गणेश प्रेमनाथ भोईर यांचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते. राकेश रामहरी यादव यांच्यावर मुलीच्या वडिलांना या प्रेमसंबंधाची माहिती दिल्याच्या संशय गणेश भोईर ह्याला होता.
हेही वाचा :- कल्याण-डोंबिवली शहरात फेरीवाला अतिक्रमणाचा मुद्दा जैसे थे पुनर्वसन राहिले कागदावरच
या संशयामुळे मंगळवारी रात्री राकेश आपली पान टपरी बंद करुन घरी जात असताना गणेश भोईर यांनी त्याच्या साथीदार रवी खिलारे व यश जाधव यांच्यासह राकेशला घेराव घातला आणि धारदार चाकूने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात जखमी राकेशचा जागीच मृत्यू झाला. राकेशचा भाऊ जसवंत यादव यांच्या फिर्यादीवरून विष्णू नगर पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आणि हत्येमध्ये वापरलेला चाकूही जप्त केला. या हत्या प्रकरणात अटक झालेल्या तीन आरोपींपैकी यश जाधव हा अल्पवयीन आहे. पोलिस निरीक्षक पवार या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Kalyan कल्याणचे दोन दिग्ग्ज दिनेश तावडे आणि अनिल पंडित भाजपात