Dombivali ; महापालिका क्षेत्रातील विवीध समस्यांबाबत आमदार राजू पाटील यांनी घेतली आयुक्तांची भेट

डोंबिवली दि.११ केडीएमसी क्षेत्रातील विवीध समस्यांबाबत मनसेचे नवनिर्वाचित आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी पालिका आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी पत्रीपुल, कोपर पूल, अनधिकृत फेरीवाले, अनधिकृत रिक्षा स्टँड, पाणी समस्या, 27 गावातील समस्या आदींकडे महापालिका आयुक्तांनी लक्ष घालून लवकरात लवकर सोडविण्याची मागणी केली. 27 गावांची वेगळी नगरपालिका करा आणि येणाऱ्या केडीएमसी निवडणूकीसोबत या 27 गावांच्या नगरपालिकेचीही निवडणूक घेण्याची आग्रही मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली.

हेही वाचा :- अनधिकृत कंदिल लावले असतील तर सगळ्यांचेच काढा एकाला वेगळा न्याय आणि दुस-याला वेगळा न्याय कसा…

तसेच रेल्वे आणि महापालिकेचे अधिकारी दोघांच्या सबंधित पत्रीपुलाचा विषय असून त्यांचा चालढकलपणा सुरू आहे. मात्र आपण लवकरच पत्रीपुलाबाबत दोन्ही संबंधित आधिकाऱ्यांची बैठक लावणार असल्याचेही राजू पाटील म्हणाले. यावेळी विरोधीपक्ष नेते प्रकाश भोईर, कल्याणचे माजी आमदार प्रकाश भोईर, हर्षद पाटील यांच्यासह मनसेचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थिती होते.

Leave a Reply

Your email address will not be published.