महात्मा गांधी स्मरणासाठी डोंबिवलीत उपोषण

डोंबिवली :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीदिनी गांधीच्या विचाराचे स्मरण होण्यासाठी, तसेच सद्याच्या पिढीचे लक्ष वेधण्याकरिता कल्याण-डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि सेवा दलाच्यावतीने गुरुवारी डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकात एक दिवसीय उपोषण करण्यात आले. सायंकाळी हे उपोषण मागे घेण्यात आले.

हेही वाचा :- भरधाव रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार दोघे गंभीर जखमी

या उपोषणात सेवा दल जिल्हा अध्यक्ष पाॅली जेकब, जिल्हा उपाध्यक्ष सुनील चव्हाण, जनरल सेक्रेटरी संतोष चंद्रापिने, युवा सेवा दलाचे जिल्हा अध्यक्ष श्रेयस सिंग, तालुका जनरल सेक्रेटरी ग्रामीणचे राम प्रताप सिंग, सेवा दल जाईंट को-ओरडीएटर आर. डी. ठाकूर, यांच्यासह सुकुमारन नायर, काँग्रेस नगरसेविका हर्षदा भोईर, काँग्रेस जिल्हा सेक्रेटरी अँथोनी फिलीप, जिल्हा उपाध्यक्ष बिजू राजन, माजी नगरसेवक रवी पाटील, नवीन सिंग,वर्षा शिखरे आदि उपस्थित होते.

हेही वाचा :- कल्याणमध्ये थरार, मोबाईल हिसकावणाऱ्यावर झडप दुसरा, चोरटा पसार

आजच्या तरुण पिढी स्वांतत्र्यकरिता बलिदान केलेल्या शेकडो स्वातंत्रवीर, सत्याग्रही व त्यांच्या विचार यांचे स्मरण होण्यासाठी, महापुरुषांनी केलेल्या बलिदानाची माहिती व्हावी, तसेच अहिंसा व देशभक्ती जागृत व्हावी, गांधीचे विचार, तत्वे यांची आजही देशाला गरज आहे. यासाठी महात्मा गांधींचे विचार, बलिदान, अहिंसा, सत्याग्रह याची आठवण करून देण्यासाठी उपोषण केल्याचे यावेळी माजी नगरसेवक नवीन सिंग, रवी पाटील आणि पाॅली जेकन यांनी सांगितले. सायंकाळी 5 वाजता उसाचा रस पिऊन उपोषण सोडले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email