Dombivali ; जागेवरून फेरीवाले एकमेकांच्या जीवावर उठले फेरीवाल्यावर प्राणघातक हल्ला
Hits: 0
डोंबिवली दि.१६ :- रस्त्यांवर अतिक्रमण करणा-या फेरीवाल्यांची मुजोरी दिवसागणिक वाढत आहे. त्यातच जागेवरून फेरीवाले एकमेकांच्या जीवावर उठल्याचे दिसत आहे. सोमवारी दुपारी मोक्याची जागा मिळवण्याच्या हट्टातून झालेल्या वादात एका फेरीवाल्याने दुसऱ्या फेरीवाल्याला बेदम मारहाण करत फरशीने डोक्यावर, छातीत प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात जाफर अली इंद्रीसी हा गंभीर जखमी झाला.
हेही वाचा :- Dombivali ; क्षुल्लक वादातून तरुणासह कुटुंबाला मारहाण
या प्रकरणी डोंबिवली पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी सलाउद्दीन सिद्दिकीविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला. डोंबिवली कल्याण स्थानक परिसरात परप्रांतीय फेरीवाल्यांनी आपले बस्तान मांडले असून त्याची मुजोरी दिवसागणिक वाढत आहे. या मुजोरीला आळा घालण्यासाठी पोलिस पालिका प्रशासनाने कठोर पाऊले उचलण्याची मागणी जोर धरू लागली आहे.