डोंबिवलीतील पक्षी अधिवास धोक्यात!

डोंबिवली दि.२२ :- दरवर्षीपेक्षा पक्षांची संख्या घटू लागली असून अनेक पक्ष्यांनी स्थलांतराची ठिकाणे बदलण्यास सुरुवात केली आहे. काही वर्षांपूर्वी मुंबईत दिसणारे पक्षी डोंबिवलीकडे स्थलांतरित झाले आहेत. तर काही पक्षी डोंबिवलीतून इतरत्र जात असल्याचे निरीक्षण ‘बर्ड आफ ठाणे रायगड डिस्ट्रिक्ट’ संस्थेच्या पक्षीमित्रांनी नोंदवले आहेत. यंदाच्या ऋतुमानाचाही परिणाम पक्ष्यांच्या स्थलांतराच्या काळावर झाल्याने अनेक पक्षी स्थलांतरित होण्यास विलंब लावत असल्याचेही दिसून आले आहे. नुकत्याच झालेल्या पक्षी निरीक्षण मोहिमेच्या निमित्ताने या संस्थेकडून ही निष्कर्ष व्यक्त करण्यात आले आहेत.

हेही वाचा :- शिवसेना आणि राष्ट्रवादी, पत्त्यांचा क्लब, ; राज ठाकरेंची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरली

पक्षी निरीक्षणात आढळलेले पक्षी

ढोकरी (इंडियन पोंड हेरॉन), दलदली तुतारी (मार्श सँडपीपर), दठपकेदार तुतारी (वुड सँडपीपर), निळ्या शेपटीचा राघू (ब्ल्यू टेल्ड बी-ईटेर), छोटा दटलवा, तांबूस पोटाचा गरुड आणि ईस्टर्न इम्पीरियल ईगल, बेलीड हॉक ईगल, अशा अनेक पक्षांचे दर्शन या ठिकाणी झाले.

हेही वाचा :- आनंदनगर झोपडपट्टी ते महापौर चा प्रवास

कचोरे पाणथळ भूमीत खोदकाम…

कल्याण-ठाकुर्लीदरम्यान कचोरे गावाच्या परिसरात रेल्वे रुळांच्या पलिकडे खाडी किनाऱ्यावर सध्या पाइपलाइनचे काम सुरू आहे. यासाठी पाणथळ भूमीवर मोठ्या प्रमाणात लोखंडी पाइप आणण्यात आले आहे. त्यामुळे या भागात पाणथळभूमीचा ऱ्हास होत आहे. यंदा या भागात पक्षी येण्याची संख्या खूप मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याची शक्यता या पक्षीप्रेमींनी व्यक्त केली आहे. डोंबिवली परिसरातील पक्ष्यांचे अधिवास असलेल्या भागात पक्षी निरीक्षणाच्या माध्यमातून नोंदी केल्या जात आहे. परंतु अशाच प्रकारचे अतिक्रमण पुढील काळात राहिल्यास हे अधिवास नष्ट होणार आहे. या भागात पक्षी दिसणारही नाहीत. त्यामुळे सध्या अस्तित्वास असलेले पक्षी पाहून घेता यावे, या उद्देशाने प्रत्येक महिन्याला या शिबिरांचे आयोजन होत असते. त्यातून पक्षी अधिवास संरक्षणाची चळवळ निर्माण व्हावी ही मुख्य भूमिका संस्थेची आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email