Dombivali ; फरार लुटारू 2 वर्षांनी पोलिसांच्या जाळ्यात

डोंबिवली :- गेल्या 2 वर्षांपासून गुंगारा देणारा कुख्यात लुटारू पप्पू उर्फ शाहनवाज नवाब शेख (35) याला डोंबिवली पोलिसांनी चातुर्याने बेड्या ठोकून गजाआड केले आहे. कल्याण कोर्टाने या लुटारूला अधिक चौकशीकरिता पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मानपाडा रोडला स्टार कॉलनीतील साई रेसिडेन्सीमध्ये राहणारे रजनीकांत चव्हाण हे 4 ऑगस्ट 2018 रोजी सकाळच्या सुमारास सर्वेश हॉल समोरून जात होते.

हेही वाचा :- कळवा मुंब्रा दरम्यान लोकल मधून पडून 1 जणांचा मृत्यू तर 2 जखमी

इतक्यात 20 – 30 वयोगटातील 4 जणांनी चव्हाण यांच्याकडील 1 लाख 80 हजारांची रोकड असलेली पिशवी खेचून पळ काढला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी किशोर नायर, संजय कोटीयन उर्फ पाटील आणि रोहित खापरे या तिघांना त्याच रात्री अटक केली होती. मात्र चौथा लुटारू पोलिसांना वारंवार चकवा देत होता. एक जण दत्तनगरमधील डीएनसी बँकेजवळ येणार असल्याची खबर डोंबिवली पोलिस ठाण्याचे सचिन वानखेडे यांना मिळाली होती.

हेही वाचा :- वालधुनी परिसराला आता अखंडित वीज कल्याण पश्चिममधून टाकली नवीन केबल

त्यानुसार वपोनि सुरेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली हेमंत राणे आणि सचिन वानखेडे या दोघांनी मंगळवारी रात्री सदर ठिकाणी सापळा लावून सदर इसमाच्या मुसक्या बांधल्या. चौकशीदरम्यान हा इसम काहीही सांगण्यास तयार नव्हता. मात्र खाक्या दाखवताच त्याने पप्पू उर्फ शाहनवाज शेख असे नाव सांगून तो कल्याण-शिळ मार्गावरील पिसवली झोपडपट्टीत राहत असल्याची, तसेच 2 वर्षांपूर्वी सर्वेश हॉल जवळ पादचाऱ्याला आपल्या साथीदारांच्या साह्याने लुटल्याची कबूल दिली. या लुटारूने मध्यंतरीच्या कालावधीत अशा प्रकारचे अनेक गुन्हे केले असावेत, असा संशय असून पोलिस त्याची कस्सून चौकशी करत आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email