Dombivali ; केअर टेकर म्हणून ठेवलेल्या महिलेने घर लुटले
डोंबिवली दि.०६ :- आई वडिलांची देखभाल करण्यासाठी केअर टेकर म्हणून ठेवलेल्या महिलेने आपल्या नातेवाईकांना बोलावून घर लुटल्याची खळबळजनक घटना डोंबिवलीत घडली आहे .डोंबिवली पश्चिमेतील गावदेवी सोसायटी मधील पांडुरंग निवासमध्ये राहणाऱ्या विद्या जगन म्हात्रे ( ३३) व त्यांचा भाऊ दोघेही कामला जातात. घरी वृद्ध आई – वडील असतात म्हणून त्यांची देखभाल करण्यासाठी विलेपार्ले येथे राहणाऱ्या रीना सिंग या महिलेला केअर टेकर म्हणून ठेवले होते .
हेही वाचा :- हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील चार आरोपींयांच्या एनकाउंटर
विद्या म्हात्रे या कामानिमित्त गोवा येथे तर त्यांचा भाऊ मुंबईला गेले होते .त्यावेळी केअर टेकर महिला रीना सिंग हिने आपले नातेवाईक सदानंद सिन्हा यांना डोंबिवली येथील म्हात्रे यांच्या घरी बोलाविले .त्या दोघांनी म्हात्रे यांच्या आई वडिलांना मारहाण करून व जीवे ठार मारण्याची धमकी देत कपाट फोडून कपाटातील ८० हजार रुपयांची रोकड व २ लाख ४० हजार रुपये किमतीचे दागिने असा एकूण ३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जबरी चोरी करून नेला .याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार विष्णू नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .