Dombivali ; ऑर्कर मंचच्या मंचावर रंगली सुरातील लिटिल स्टारची स्पर्धा
डोंबिवली दि.१८ :- मुले ही देवा घरची फुले हे बालदिनी जेव्हा ही स्पर्धा आयोजित केली तेव्हा ऑर्कर मंचने म्हटलं होतं खरच बागेत अनेक फुले असतात त्याच प्रमाणे स्वरांचे अनेक स्वर लहान मुलांमुळे या स्पर्धेतून ऐकायला मिळाले व 300 हुन अधीक मोठा सहभाग मुंबई, महाराष्ट्र व उप राज्यातून पहायला मिळाला तेही ऑनलाईन स्पर्धेतून व निकाल काढताना ही परीक्षकांना कौतुक वाटले. विशेष म्हणजे सेवा सहयोग संस्थेने आणि हेमंत नेहते यांनी लहान कलाकारांशी संपर्क साधला आणि सहभाग वाढवला.
हेही वाचा :- २६ डिसेंबर रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण
तसेच या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून लाभलेले सत्यदीप मगर यांनीही निकाल खूप उत्कृष्टरित्या लावला. ते स्वतः गीतकार, संगीतकार, गायक व गुरूजी पं. भूपाल पणशीकर यांचे शिष्य आहेत. वेळातवेळ काढून त्यांनी केलेले हे कार्य मोठे मोलाचे आहे. विजेत्यांना ऑर्कर मंचने ट्रॉफी, मॅडल व सर्टिफिकेट देऊन गौरविले व पुढील वाटचालीकरीता एक नवीन विश्वास त्यांच्या मनात निर्माण केला.
हेही वाचा :- आर्थिक मंदीचे संकेत रिझर्व्ह बँकेने आधीच ओळखले, म्हणून घटवले व्याजदर
प्रथम क्र. अंशुलिका कुमारी, द्वितीय क्र. अभिषेक आडे, तृतीय क्र. सलमान खान व चतुर्थ क्र. मानसी मुने, तसेच उत्तेर्जनाथ चिन्मय मोरे, तेजल धुळे, श्रद्धा मिसळ, साक्षी ठोंबरे, पायल पेटारे, विजया लिंगायत, अशेईनी जाईलकर, रिद्धी काळे, रुतीका पाटकर, मोनाली दुमडे अशी लिटिल स्टार गायक विजेत्यांची नावे आहेत. तसेच ऑर्कर मंचचे आयोजक सुहास जाधव व टीम तसेच आनंद कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष सहयोगी हेमंत नेहते, सेवा सहयोगचे निर्माता किशोर मोघे यांनी इतर सहभागी सर्व लिटिल स्टार गायकांचे कौतुक केले.