मी उरणकर सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप.
उरण दि ३। (विठ्ठल ममताबादे )
महाराष्ट्र दिना निमित्त मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान संस्था उरण यांच्या मार्फत उरण तालुक्यातील २०० आदिवासी कुटुंबाना (नागाव -पिरवाडी, आणि चिरनेर येथील बांधवाना)धान्य आणि दैनंदिन वस्तु(तांदूळ,डाळ तेल, कांदे – बटाटे, चहा पावडर, साबण ) वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाला अध्यक्ष विशाल पाटेकर – आणि सदस्य शैलेश गावंड, विकास पाटेकर, बादल म्हात्रे, अतुल ठाकुर ,सुरज म्हात्रे राकेश पाटील, निलेश पाटील, अनिल पवार, भावेश रावत , तेजस बांबूलकर, विजेंद्र म्हात्रे आदी सदस्य उपस्थित होते.
कोरोना काळात बेरोजगारी वाढली, गोरगरिबांना लॉक डाऊन काळात कोणतेच रोजगार उपलब्ध नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून, सामाजिक बांधिलकी जपत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे अध्यक्ष विशाल पाटेकर यांनी सांगितले.