पाण्याची गोष्ट,संपूर्ण महाराष्ट्र पाणीदार करणारे आणि वॉटरकप स्पर्धेत यशस्वी ठरलेले ‘गावकरी’आपल्या भेटीला

गेली काही वर्षे दुष्काळाचे दुष्टचक्र महाराष्ट्राच्या मागे लागले आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे संपूर्ण जीवनमान शेतीवर अवलंबून असल्याने दुष्काळाचा प्रकोप जास्त जाणवतो. अशा परिस्थितीत संपूर्ण महाराष्ट्र पाणीदार करण्याचे स्वप्न पाहिले ते आमिर खान, सत्यजीत भटकळ यांच्या ‘पानी फाऊंडेशनने’.

तीन वर्षांपूर्वी त्या दृष्टिने पहिले पाऊल उचलले गेले ते जनसहभागातून जलसंधारण”हा गाभा असलेल्या ‘सत्यमेव जयते वाॅटरकप” स्पर्धेच्या माध्यमातून.

‘व्यक्ती निर्माणातून समाज बदल’ हे ध्येय मानलेल्या ‘ज्ञानप्रबोधिनी’ संस्थेची अंबाजोगाई शाखा पाण्याच्या प्रश्नासाठी मराठवाड्यातील सहभागी गावांच्या मदतीसाठी धावून गेली. मुंबई, ठाणे, डोंबिवलीतील ‘विवेकवाडी परिवाराच्या’ समविचारी मित्रमंडळींनी देखील या कामामध्ये खारीचा वाटा उचलला. यावर्षी काम केलेली अनेक गावे वॉटरकप स्पर्धेत यशस्वी ठरली. पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे ही गावं पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाली.

 

तर अशी ही पाण्याची गोष्ट अधिक विस्ताराने जाणून घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे विवेकवाडी परिवाराच्या मित्रमंडळींनी. सत्यजीत भटकळ, या पूर्ण प्रवासाचे साक्षीदार असलेले प्रसाद चिक्षे आणि वॉटरकप स्पर्धेत यशस्वी ठरलेले ‘गावकरी’आपल्या भेटीला येत आहेत

दिनांक : शनिवार, १ डिसेंबर २०१८
स्थळ :
मराठा मंडळ मुलुंड, मुंबई.
वासुदेव बळवंत फडके मार्ग,
कै. वसंतराव सकपाळ चौक, (९० फिट रोड)
केळकर महाविद्यालयाजवळ,
मुलुंड (पू ),

वेळ : दुपारी ४.०० ते ७.००
प्रवेश विनामूल्य

कण्हत जगण्यापेक्षा परिस्थितीशी झुंजत पाण्याची गंगा आपल्या गावात आणणाऱ्या या भगिरथांना भेटण्यासाठी, त्यांची यशोगाथा त्यांच्याच तोंडून ऐकण्यासाठी, त्यातून प्रेरणा घेण्यासाठी आपणां सर्वांना या कार्यक्रमाचे निमंत्रण आयोजकानी दिली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email