हिंदुत्ववादी शिवसेनेची गोची…

Hits: 1

(शेखर जोशी)

फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानातील हिंदूना अनन्वित अत्याचाराला सामोरे जावे लागले होते. यातून महिला, पुरुष, लहान मुले कोणीही सुटले नाहीत. अनेकांची घरे, व्यवसाय आणि आयुष्याची राखरांगोळी झाली होती. शेकडो निरपराध हिंदूचा बळी गेला होता. फाळणीच्या जखमा उरी बाळगलेल्या त्या हिंदूंच्या आत्ताच्या पिढ्यांना याचा मनापासून आनंद झाला असेल आणि जे बळी गेले त्यांना नागरिकत्व दुरुस्ती विधेयक ही खरी श्रद्धांजली ठरेल. प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकासाठीही ही आनंदाची गोष्ट आहे.

हेही वाचा :- हिंदुत्ववादी शिवसेनेची गोची…

बदललेली राजकीय परिस्थिती आणि ‘दहा जनपथ’ व ‘सिल्व्हर ओक’च्या रिमोट कंट्रोलमुळे ज्वलंत हिंदुत्ववादी असे म्हणवून घेणा-या ‘उठा’ यांच्या शिवसेनेला याविषयी निखळ आनंद आणि उघड भूमिकाही घेता येत नाहीये. शब्दांच्या निरर्थक खेळातच ते मश्गुल आहेत. त्यांना (उत) आला आहे. शिवसेनेची खरोखरच गोची झाली आहे. आता यापुढे प्रत्येक वेळी शिवसेनेला असेच घुमजाव (लोकसभेत नागरिकत्वदुरुस्ती विधेयकाला पाठिंबा आणि राज्यसभेत मात्र विरोध) करावे लागणार आहे.

हेही वाचा :- क्लस्टर पात्र इमारतींवर रस्तारुंदीकरणाची कारवाई नको प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिवावासीय उभारणार मानवी साखळी

दरवेळी दोन्ही कॉंग्रेसच्या दबावाखाली राहूनच आपली भूमिका ठरवावी लागणार आहे. वर्षानुवर्षे मुस्लिम लांगूलचालन करणारा कॉंग्रेस पक्ष आणि हिंदू आतंकवादी असा शब्दप्रयोग पहिल्यांदा करणारे राष्ट्रघातकीही एकाच माळेचे मणी आहेत. या दोघांच्या मागे फरफटत जाऊन शिवसेना आणि ‘मामु’ आणखी किती नुकसान करून घेणार आहेत, हे येणारा काळच ठरवेल.

Leave a Reply

Your email address will not be published.