सकाळच्या सत्रात डोंबिवलीतून ४० लोकल सोडाव्यात डोंबिवलीकरांची मागणी

{श्रीराम कांदु}

डोंबिवली दि.२५ :- मध्य रेल्वेला सर्वात जास्त महसूल देणाऱ्या डोंबिवली स्थानकाची दुरावस्ता मोठ्या प्रमाणत झाली आहे. अनेक समस्यांना प्रवाश्यांना सामोरे जावे लागत असून गर्दीमुळे रेल्वे प्रवासात डोंबिवली स्थानक दरम्यान शेकडो प्रवाशांचा मृत्यू होत आहे. रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात डोंबिवलीतून ४० लोकल सोडाव्यात, अशी मागणी डोंबिवलीकरांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अशा विषयाचे निवेदन डोंबिवलीकर गोरखनाथ म्हात्रे यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना दिले असून त्याबाबतची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे, रेल्वे प्रबंधक मुंबई, खासदार श्रीकांत शिंदे, सुप्रिया सुळे, कपिल पाटील तसेच डोंबिवली रेल्वे पोलिसांचेही लक्ष वेधले आहे.

हेही वाचा :- रेल्वेतुन पडून युवकाचा मृत्यू

डोंबिवली स्थानकांतून गर्दीच्या वेळी सकाळी ७ ते १२ दरम्यान मोठ्या प्रमाणत रेल्वे प्रवाश्यांची गर्दी असते. अंबरनाथ, बदलापूर आणि कल्याण दरम्यान येणाऱ्या लोकलमधून ४ लाख रेल्वे प्रवासी प्रवास करीत असल्याने डोंबिवलीतील प्रवाश्यांना तेथून येणाऱ्या रेल्वे गाडीत चढणे अतिशय काठीण होत आहे. डोंबिवली स्थानकातून रोज सुमारे २ लाख ६४ हजार प्रवासी रेल्वेतून नोकरी निमित प्रवास करीत असतात. म्हात्रे यांच्या निवेदनानुसार या संपूर्ण प्रवाश्यांमध्ये ६५ टक्के तरुण नोकरदार रेल्वे प्रवासी असतात.

हेही वाचा :- डोंबिवली-कोपर दरम्यान लोकलमधून पडून तरुणीचा बळी

तसेच डोंबिवली स्थानकातून सकाळी ५:५७ ते दुपारी १२:०८ दरम्यान १२ डोंबिवली लोकल असून त्या अत्यल्प आहेत. डोंबिवली स्थानकांतून सकाळच्या सत्रात प्रत्येक दहा मिनिटाला डोंबिवली स्थानकातून डोंबिवली लोकल असावी अशी मागणी आहे. डोंबिवली स्थानकातून महिला स्पेशल लोकल ट्रेनची मागणी केली आहे. डोंबिवली स्थानकातून सुटणाऱ्या १५ जलद आणि २५ गाड्या धीम्या स्वरूपाच्या असाव्यात. डोंबिवली स्थानकाची स्वच्छताही राखली पाहिजे. स्थानकातील सरकते जिने बहुतेक वेळा बंद असल्याने जेष्ठ तसेच महिला वर्गाला त्रास होतो. अशा प्रकारची खबरदारी रेल्वे प्रशासनाने घेतली तर डोंबिवली स्थानका दरम्यान होणाऱ्या रेल्वे प्रवासातील मृत्यूंची संख्या कमी होईल व यापूर्वी रेल्वे प्रवासा दरम्यान मृत झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली मिळेल, असेही या निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.