पैश्यांची मागणी केल्याने शौचालय चालकाला बदडले

कल्याण दि.१४ :- पश्चिमेकडे एपीएमसी मार्केट परिसरात असलेल्या सार्वजनिक शौचालयाची देखभाल करण्याचे काम शंकर महातो करतात. मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एक इसम शौचालयात आला. शौचलायचा वापर करून हा इसम बाहेर पडला.

हेही वाचा :- Kalyan ; रेडकू कापणाऱ्या तिघा कसायांवर गुन्हा

शंकर याने या इसमाकडे पैसे मागितले. त्यामुळे संतापलेल्या इसमाने शंकरवर जवळच पडलेल्या कटरने हल्ला केला. या हल्ल्यात शंकर याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्याने बाजारपेठ पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदविली. या तक्रारीनुसार पोलिसांनी फरार हल्लेखोराच्याविरोधात गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email