पुरावे खोटे असल्याचे जाहीर करा अन्यथा माफी मागा -आ. जितेंद्र आव्हाड

किल्लेप्रकरणावर आ. आव्हाडांनी केली सरकारची कोंडी
ठाणे (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील किल्ल्यांचे बाजारीकरण करण्याची योजना सरकारने आखली आहे. संरक्षित आणि असंरक्षित असे कागदी खेळ करुन 25 किल्ल्यांचे रिसॉर्टमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या किल्ल्यांचा आणि मराठ्यांच्या इतिहासाचा काही सबंध नसल्याचे सांगितले जात आहे. तरीही, अनेक किल्ले हे बौद्ध आणि जैन शासकांच्या काळातील आहेत. या किल्ल्यांवरील स्थापत्य कला त्याची साक्ष देत आहेत. येथील दगड त्या पर्वातील इतिहासाचे साक्षीदार आहेत. त्याचे पुरावेही उपलब्ध आहेत. असे असतानाही जर हे सरकार सदर किल्ल्यांचे बाजारीकरण करीत असेल तर त्यांनी हे पुरावे खोटे आहेत, असे जाहीर करावे; अन्यथा, माफी मागावी, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला दिले आहे.
एमटीडीसीने राज्यातल्या एकूण 25 किल्ल्यांची यादी तयार केली आहे. ही यादी नव्या प्रस्तावासह मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. 60 वर्षे ते 90 वर्षे अशा भाडे कराराने हे किल्ले खासगी हॉटेल्सना देण्यात येणार आहेत. त्याविरोधात रणशिंग फुंकल्यानंतर मराठ्यांचा, शिवरायांचा सबंध नसल्याचा दावा सरकारच्या वतीने करण्यात आला आहे. त्याशिवाय, या सरकारने जाधवरावांच्या गढीचा संदर्भ दिला आहे.ही गढी त्यांची खासगी मालमत्ता होती. जाधवराव कुटुंबाच्या या गढीला आग लागली. त्यानंतर हॉटेल व्यवसायात असलेले विठ्ठल कामत ज्या उद्योजकाने ग्रामिण विभागामध्ये हातपाय पसरायला सुरुवात केली होती त्यांना ही आयती संधी चालून आली व त्यांनी दादा जाधवराव व त्यांच्या अख्ख्या खानदानाशी चर्चा करुन ह्या घराच रुपांतर रिसॉर्टमध्ये केले.
साल्हेरचा किल्ला, कोरीगड किल्ला, पारोळ किल्ला, घोडबंदर किल्ला, कंधार, नगरधन किल्ला यासारखे 25 किल्ल्यांवर रिसॉर्ट आणि हॉटेल्स बांधण्यात येणार आहेत. मात्र, या किल्ल्यांचा इतिहासही दैदीप्यमान आहे. साल्हेर, कोरीगड या किल्ल्यांना शिवरायांच्या पराक्रमाची झालर आहे.
साल्हेरच्या लढाईत पहिल्यांदाच शिवरायांच्या मावळ्यांनी आपला नेहमीचा गनिमी कावा न वापरता मराठ्यांनी साल्हेरच्या पायथ्याशी उघड्या मैदानात मुघलांना अंगावर घेतलं होतं. लष्करीदृष्ट्या अशा लढाईत मुघल मराठ्यांपेक्षा नक्कीच सरस होते. तरीही जिगरबाज मावळ्यांनी ही लढाई जिंकून मुघलांची मक्तेदारी संपुष्टात आणली अन् सबंध बागलाण प्रांतावर ताबा प्रस्थापित केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना आता कमी लेखता कामा नये आणि आणि स्वतःच दख्खनमध्ये उतरून दिवसेंदिवस वाढत असलेलं मराठा साम्राज्य संपवलं पाहिजे असा जो निर्णय पुढे औरंगजेबाने घेतला. साल्हेरच्या लढाईत सूर्याजी काकडे हा महाराजांचा एक अत्यंत जवळचा सहकारी तोफेच्या गोळ्याने मारला गेला. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाशी भेट घेताना जे काही निकटचे मराठा सरदार खानाच्या फौजेवर तुटून पडायला तयार होते, त्यापैकी सूर्याजी काकडे हा एक होता. लोणावळ्याचा कोरीगड किल्ला तो ही शिवाजी महाराजांनी आपल्या ताब्यात घेतला. कोकण आणि घाट यांना जोडणारा हा महत्त्वाचा दुवा होता. आज जळगाव जिल्ह्यात असलेला पारोळा किल्ल्यातच 1857 च्या पहिल्या ब्रिटिशांविरुद्ध झालेल्या झालेल्या बंडातील नायिका असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म झाला होता. घोडबंदर चा किल्ला जा पोर्तुगीजांनी बांधला 1530 मध्ये शिवाजी महाराजांनी त्या नंतर त्यावर आक्रमण केले पण चिमाजीअप्पा ह्यांनी तो जिंकला
तर, कंधार, नगरधन किल्ल्यांना 1200 ते 1700 वर्षांचा इतिहास आहे. येथील स्थापत्य कलेचा अभ्यास केल्यास हे किल्ले म्हणजे बौद्ध आणि जैन शासकांनी बांधलेले असल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रश्न असा पडतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना हात लावणार नाही असं म्हणणारं सरकार इतिहासाशी बेइमानी कसं करू शकतं? महाराष्ट्राचा इतिहास फक्त छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत थांबत नाही. त्यांच्यापासून प्रेरणा घेणारे असंख्य लोक आहेत. त्यात मुघलांना चोपून काढणारे संताजी-धनाजी आहेत. आणि अटकेपार झेंडे फडकवणारे सरदारही आहेत. या किल्ल्यांना ऐतिहासिक संदर्भ आहेत. असे असतानाही महाराष्ट्र शासनाने याच किल्ल्यांच्या संदर्भात सादर केलेले ‘ पॉवर ऑफ प्रेझेंटेशन’ हे सरकार कसे काय नाकारु शकते? असा सवाल करुन हे पुरावेही नाकारण्याचे काम हे सरकार करीत आहे; मराठी जणांनी दिशाभूल करण्यो काम हे सरकार करीत आहे. त्यामुळे या सरकारने आमची अस्मिता असणारे हे किल्ले जतन करावेत, अशी मागणी करतानाच पुरावे खोटे असल्याचे जाहीर करावे अन्यथा महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, असे आवाहन आ. जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

Hits: 2

Leave a Reply

Your email address will not be published.

RSS
Follow by Email