धक्कादायक! डोकेदुखीच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू
मुंबई दि.१२ :- डोकं दुखीचा त्रास थांबावा म्हणून एका महिलेने तब्बल १५ गोळ्यां घेतल्या. परिणामी औषंधीच्या व्हरडोसमुळे त्या महिलेला आपला प्राण गमावावे लागले. वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असल्यास त्यावर एखादी गोळी घेऊन अनेकजण सुटका करून घेतात. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय किंवा गोळ्यांच्या अतिसेवनामुळे गंभीर परिणामांना सामोरं जाण्याची शक्यता असते. कधीकधी यातून मृत्यूही संभवतो. बंगळुरूमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे.
हेही वाचा :- युरोपियन स्पेस एजन्सीला जे 12 वर्षात जमलं नाही; ते इस्रोनं अवघ्या 35 तासांत करुन दाखवलं
दीर्घ काळापासून असलेली डोकेदुखी बरी करण्यासाठी दिलेल्या औषधाच्या गोळ्यांचा अतिडोस घेतल्यामुळे एका महिलेचा सोमवारी मृत्यू झाला. अनुसूयाम्मा (४५) असे मृत स्त्रीचे नाव असून तिने शनिवारी डोकेदुखी बरी करणाऱ्या औषधाच्या १५ गोळ्या एकदम घेतल्या होत्या. शनिवारी अनसूयाम्माने हा अतिडोस घेतल्यानंतर त्यांची शुद्ध हरपली. त्यांच्या मुलीने तातडीने अनुसयाम्मांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना व्हिक्टोरिया रुग्णालयात भरती करण्यात आले. दोन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. तिच्या पतीने पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार अनेकल पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.