डोंबिवलीत भरदिवसा दोन घरफोड्या, 9 लाखांच्या रकमेसह हजारोचा ऐवज लंपास

कल्याण : डोंबिवली पूर्वेकडील महत्मा गांधी रोड महालक्ष्मी कृपा सोसायटी मध्ये राहणारे संजय मोरे रविवारी सकळी दहा वाजण्याच्या सुमारास कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले होते .घराला कुलूप आल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील 9 लाखांची रोकड व सुमारे दीड लाखांचे दागिने चोरून नेले सायंकाळी घरी परतल्या नंतर त्यांना घरात चोरी झाल्यचे लक्षात आले त्यांनी या प्रकरणी टिळक नगर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दखल केला आहे तर दुसरी घटना नांदिवली परिसरात घडली आहे .डोंबिवली पूर्वेकडील नांदिवली परिसरात साई गणेश दर्शन इमारती मध्ये राहणारे तुषार माजळकर हे बुधवारी सकाळी आपल्या राहत्या घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेले होते .हि संधी साधत अज्ञात चोरट्याने त्याच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील ५१ ह्जारंचे दागिने चोरून नेले .सायंकाळी घरी परतल्या नंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दखल त्याचा शोध सुरु केला आहे

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email