कोर्ट नाका येथील टाऊन हॉल ठाणेकरांसाठी सुरू
(म.विजय)
ठाणे दि.२१ :- आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील कोर्ट नाका येथील टाऊन हॉल ला भेट दिली. यावेळी पी डब्लू डी च्या परदेशी मॅडम तसेच अधिकारी वर्ग उपस्थित होता. ठाण्याच्या कोर्ट नाका या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक टाऊन हॉल जो डम्पिंग हॉल झाला होता त्याचे आमदार संजय केळकर यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांच्या सहकार्याने नूतनीकरण करून ठाणेकरांसाठी सुरू केले होते.
हेही वाचा :- ठाणे जिल्ह्यातील शाळांना आरटीई प्रतिपूर्तीसाठी ४ कोटी मंजूर
आता पुन्हा त्यातच हेरिटेज प्रमाणे त्याचे नूतनीकरण आ. केळकर यांच्या प्रयत्नातून व जिल्हाधिकारी यांच्या सहकार्याने होत आहे. याठिकाणी अँम्पी थियटर व उभारण्यात येणाऱ्या डोंब करिता आ. केळकर यांनी त्यांचा आमदार फंड ही दिला असून जिल्हा नियोजन मधूनही तरतूद करण्यात आली आहे. ठाण्यातील सांस्कृतिक व सामाजिक संस्थान करिता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यास अल्प दरात उपलब्द्ध होणार असून सांस्कृतिक चळवळीस चालना मिळेल असे आमदार संजय केळकर बोलताना सांगितले.