संजय राऊत यांच्याकडून न्यायालयाचा अवमान?

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री दहा ते सकाळी सहा ध्वनिक्षेपक लावण्यास बंदी आहे. त्याचे पालन शिर्डी साई संस्थानने केले आणि त्यामुळे तिथे पहाटेची काकडआरती ध्वनिक्षेपकाविना झाली.

ठिक आहे, यात आकाश कोसळण्यासारखे काय झाले आहे? शिवसेना नेते, मुख्यप्रवक्ते संजय राऊत यांनी याला ‘काळा दिवस’ म्हटले आहे. अहो संजय राऊत शब्दांचे खेळ करत कशाला नाहक लावालाव्या करण्याचे उद्योग करता आहात?

हे करताना तुम्ही प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचाच अवमान केला आहे, असेच म्हणावे लागेल.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे हे चांगलेच आहे की? साई संस्थानने त्याचे पालन केले. नक्कीच स्वागतार्ह निर्णय आहे. त्यात वाईट काय?

उलट हा ‘काळा दिवस’ आहे असे सांगून तुम्हीच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला आहे. (किरीट सोमय्या- या प्रकरणी राऊतांवर करा एखादा गुन्हा दाखल)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नेहमी सांगतात, आमचे हिंदुत्व शेंडी- जानव्याचे किंवा घंटा बडविणा-यांचे नाही.

मग खरे तर साई संस्थानच्या निर्णयाचे सुधारणावादी हिंदू म्हणून तुम्ही स्वागत करायला हवे होते. पण ते न करता विषयाला भलतेच फाटे फोडलेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी जाहीरपणे साई संस्थानचे कौतुक केले पाहिजे. पण इथे तुम्ही मूग गिळून गप्प बसाल.

आता हिंमत असेल तर तुम्ही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी मुस्लिम समाजातील सर्व लोकप्रतिनिधींना, मशिदींच्या मौलवींना मशिदींवरील भोंगे काढण्याचे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याविषयी आवाहन करावे.

आवाहन करूनही मशिदींवरील भोंगे उतरवले जात नसतील तर सर्व पोलीस फौजफाटा कामाला लावून पुढच्या काही दिवसांत मशिदींवरील हे भोंगे उतरवून दाखवावेत.

पण तुमच्यात ती धमक नाही हेच सत्य आहे.

©️शेखर जोशी यांचा फेसबुक वॉल वरून साभार
४ मे २०२२

Leave a Reply

Your email address will not be published.