ग्राहकांचा कल इकोफ्रेंडली गणेश मुर्तीकडे

(विठ्ठल ममताबादे)

उरण दि.२८  – यंदा 2 सेप्टेंबर 2019 रोजी देशात गणेशोत्सवाला सुरवात होणार असून महाराष्ट्रात हा सण सर्वत्र मोठ्या भक्ति भावाने साजरा केला जातो. या सणाचा आनंद घेण्यासाठी बाहेरुन सुद्धा अनेक व्यक्ति महाराष्ट्रात येतात. सध्या गणेशोत्सव जवळ आल्याने गणेशमूर्तीची खूप मोठी मागणी वाढली आहे. त्यातच पर्यावरणाचे संरक्षण करणाऱ्या इकोफ्रेंडली गणेश मुर्तीना बाजारात खूप मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. बाजारात प्लास्टर ऑफ पॅरिस व इतर रासायनिक घटकापासून बनविलेल्या अनेक मुर्ती विक्रिस आले आहेत. मात्र या मुर्त्यामुळे पर्यावरणाचे खूप मोठे नुकसान होत आहे. तसेच पाण्याचेही प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात होत आहे.

म्हणून प्रदूषण विषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने उरण शहरात उरण मोरा रोड वरिल एकदंत अपार्टमेंट मध्ये आर्ट क्रिएशन कला केंद्र येथे शाडुच्या मातीपासून बनविलेलि इकोफ्रेंडली गणेश मुर्ती विक्रिस ठेवण्यात आलेले आहेत. 8 इंचा पासून ते 4 फूटा पर्यंत  गणेश मुर्ती बाजारात उपलब्ध असून सध्या हे इकोफ्रेंडली गणेश मुर्ती 2000 रुपया पासून येथे उपलब्ध आहेत. अनेक निसर्गप्रेमी व्यक्तिंनी अगोदरच इकोफ्रेंडली मुर्ती बुकिंग करून ठेवले आहेत. हल्ली इकोफ्रेंडली गणेश मुर्तीना बाजारात ग्राहकांची खूप मोठया प्रमाणात मागणी आहे. यातून जनतेमध्ये पर्यावरण संरक्षणाचा संदेश जात असल्याचे मत मालक रूपेश पाटिल यांनी व्यक्त केले. उरण मधील आंतरराष्ट्रीय चित्रकार रूपेश पाटिल यांच्या आर्ट क्रिएशन  कला केंद्र मधील इकोफ्रेंडली गणेश मुर्तीचे सर्व सामाजिक संस्था, निसर्ग संघटनेने स्वागत केले असून रूपेश पाटिल पर्यावरण कार्यास हातभार लावत असल्याने निसर्गप्रेमीकडून त्यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email