`एक घर एक खेळाडू` रिजेंसी संकुलाची संकल्पना….

खेलकुद स्पर्धेतून देशाचे प्रतीनिधीत्व करणारे खेळाडू तयार करण्याचा प्रयत्न

डोंबिवली दि.०९ – `एक घर एक खेळाडू` अशी संकल्पना करत देशाचे प्रतीनिधीत्व करणारे खेळाडू तयार करण्याचा प्रयत्न रिजेंसी संकुल करत आहे. यासाठी गेल्या सात वर्षापासून रिजेंसी संकुल खेलकुद स्पर्धा आयोजित करत आहे. तसेच आरोग्य आणि करिअर यांचा उत्तम मेळ साधत आरोग्यम धनसंपदा हा मूलमंत्र जपण्याचा संदेशही देण्यात आला असल्याचे अध्यक्ष अमित म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. डोंबिवली पत्रकार संघाच्या वतीने रीजेंसी संकुलातील क्लब ऑफिस मध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

हेही वाचा :- डोंबिवलीतील उजाला गायन स्पर्धेत ओमकार इंटरनॅशनल स्कूलची बाजी

यावेळी अध्यक्ष अमित म्हात्रे, रिजेंसी रहिवासी संकुलाचे सचिव सुधीर परब, क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ, शंकुतला वाघ आणि साईधाम मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. खेलकुद स्पर्धेची महितो देताना अध्यक्ष अमित म्हात्रे म्हणाले, रीजेंसी संकुलातील साईधाम मित्र मंडळाच्या वतीने ८ डिसेंबर ते २६ जानेवारी दरम्यान मैदानी आणि बंदिस्त खेळांच्या स्पर्धाचे आयोजन रिजेंसी संकुलात करण्यात येत आहे. या संकुलातील खेळाडूंना मैदानावर आणण्याचे काम या स्पर्धानी केले.क्रिकेट सामन्यांमुळे या स्पर्धाना चालना मिळाली.प्रत्येक घरात एक खेळाडू घडला पाहिजे हि यामागची भावना आहे.

हेही वाचा :- थंड हवेचे ठिकाण नेरळ ते माथेरानचा प्रवास गारेगार

डोंबिवलीत आदर्श संकुल निर्माण व्हावे अशी आमची इच्छा आहे.यंदाच्या वर्षी स्नूकर, बिलबोर्ड, कँरम, क्वँश, टेबल टेनिस इत्यादी बंदिस्त खेळ व क्रिकेट , फुटबॉल या मैदानी पंचवीस खेळांचे आयोजन यंदा करण्यात आले आहे. या स्पर्धेत सातशे स्पर्धेक सहभागी होणार आहेत. लहान मुलांपासून ते ऐंशी वर्षाच्या जेष्ठ नागरिक या स्पर्धेत उत्साहात सहभागी होत असतात.पन्नास दिवस या स्पर्धा सुरु असतात.मँट नसल्याने कबड्डी स्पर्धा आयोजित करत नाही. केडीएमसीच्या मँरेथान स्पर्धेत इथले खेळाडू मार्गदर्शक असल्याची पुष्टी म्हात्रे यांनी दिली. क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ म्हणाले, ११०० घरांचे हे संकुल आहे. या संकुलात सर्व सुविधा उपलब्ध आहेत. अश्या संकुलात खेळाडू नसतील असे शकत नाही. मग अश्या खेळाडूंना मैदानात आणण्याचे काम रीजेंसी संकुलातील साईधाम मित्र मंडळ करत आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे कि. खेलकुद स्पर्धेतून भविष्यात देशाचे प्रतीनिधीत्व करणारे खेळाडू तयार होतील.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email