टीडीआरएफ बळकटीकरणासाठी विशेष समिती साधनसामग्री कमी पडू न देण्याचा आयुक्तांचानिर्णय

म. विजय

ठाणे (29) बदलापूर येथे महालक्ष्मी एकक्स्रेसमध्येअडकलेल्या प्रवाशांच्या मदतकार्यात महत्वाचीकामगिरी बजावल्यानंतर महापालिका आयुक्त संजीवजयस्वाल यांनी आज ठाणे आपत्ती प्रतिसाद दलबळकटीकरणासाठी अतिरिक्त आयुक्त(2) समीरउन्हाळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीतकरण्याचा निर्णय घेतला. तसेच उल्लेखनिय कामगिरीबजावल्याबद्दल टीडीआरएफच्या सर्व जवानांचेकौतुक केले. दरम्यान टीडीआरएफ टीमला आवश्यकती साधनसामग्री देण्याबरोबरच त्यांना विविध प्रकारचेप्रशिक्षण देण्याच्या सूचनाही श्री. जयस्वाल यांनीकेल्या.

आपत््कालीन परिस्थतीचा सामना करण्यासाठीएनडीआरएफच्या धर्तीवर ठाणे आपत्ती प्रतिसाद दल(टीडीआरएफ) ची स्थापना करण्याचा निर्णयमहापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतलाहोता. त्यानंतर या पथकामध्ये राज्य अग्नीशमनप्रशिक्षण केंद्रातील40 प्रशिक्षित जवानांचीनियुक्तीकरण्यात आली होती. या जवानांना एनडीआरएफ,सिव्हील डिफेन्स, मुंबई आपत्ती प्रशिक्षण केंद्र आदीठिकाणी या जवानांना प्रशिक्षण देण्यात आले.त्याचबरोबर पुरपरिस्थितीत काय करायला हवे याचेहीप्रशिक्षण या जवानांना देण्यात आले आहे.

सद्यस्थितीत उर्वी पार्क येथे या दलाचे मुख्यालयबनविण्यात आले असून त्या ठिकाणी आवश्यक ती साधन सामुग्री सह एक अँब्युलन्स तैनात करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी टीडीआरएफ बळकटी करणासाठी अतिरिक्त आयुक्त (2) समीर उन्हाळे यांच्या अध्यक्षते खाली विशेष समिती गठीत केली आहे. सदर समिती टीडीआरएफच्या जवानांना प्रशिक्षण देणे तसेच या दलासाठी आवश्यक ती साधन सामुग्री पुरविणे आदी विषयी महापालिका आयुक्तांना अहवालदेणार आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email