Dombivali ; गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना अल्पवयीन विद्यार्थीनीसोबत अश्लील चाळे
Hits: 0
डोंबिवली दि.१७ :- एका ट्यूशन क्लासेसच्या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थीनीसोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सुहास कुशवाहा हा नववी ते दहावीच्या विद्यार्थाना शिकवत असून तो स्टीफन क्लासेस नावाने खासगी क्लासेस चालवतो. पीडित मुलीनी पालकांसोबत पोलिसांत सुहास कुशवाहा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मागील काही दिवसांपासून मुली क्लासेसला जाण्यास नकार देत होत्या. पालकांनी याबाबत विचारले असता सर्व प्रकार समोर आला.
यानंतर मुलीनी पालकांसोबत जाऊन मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी याबाबत दाखल घेत पोस्को आणि विनयभंगानुसार गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. सुहास अल्पवयीन मुलींना अनेक प्रकारच्या आमिष दाखवत अश्लील चाळे करत होता. या प्रकरणी पालकांमध्ये त्यांच्या मुलांच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त होत आहे. कारण दहावीच्या परीक्षेची वेळ जवळ आली आहे आणि हजारो रुपये वर्गात फी म्हणून भरले गेले आहेत.