नागरी संरक्षण दलचे रायगड जिल्ह्यातील स्वयंसेवक हरेश्वर ठाकूर रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित ..

(विठ्ठल ममताबादे)

उरण दि.१८ – रोहा येथे सी डी देशमुख सभागृहात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तिंना रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने रायगड भूषण पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले. शेकापचे सरचिटणीस आ.जयंत पाटिल, माजी मंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे, उपाध्यक्ष आस्वाद पाटिल यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. यावेळी उरण तालुक्यातील सावरखार गावातील हरेश्वर जनार्दन ठाकूर (शिक्षण पोस्ट ग्रेज्युऐशन 2nd year)हे अनेक वर्षा पासून नागरी संरक्षण दल रायगड यांच्या वतीने रायगड जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन शिबिरात शिबिरार्थिंना प्रशिक्षण व प्रात्याक्षिक सह मार्गदर्शन करतात. मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आणि मा. उपजिल्हाधिकारी, मा. सागर पाठक (आपत्ती व्यवस्थापन प्रमुख) यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन प्रक्षिशण, मोक ड्रिल, डेमो यांचे प्रात्यक्षिके ही घेण्यात आली, हरेश्वर ठाकुर यांनी रायगड जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयात जाऊन आपत्ती व्यवस्थापन बाबत शिबीर घेवून समाजात जण जागृती केली आहे.

यासोबतच शासकीय कर्मचारी, औदयोगिक विभाग, पंचायत समिती, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, प्राथमिक शाळा, हायस्कूल, गावातील प्रत्येक नागरिकाला हे प्रशिक्षण देण्यात आले आहे, आपत्ती व्यवस्थापन राज्यस्तरीय पाठ्यक्रम या मध्ये रायगड जिल्ह्याच नेतृत्व करताना हरेश्वर ठाकुर यांनी रायगड जिल्ह्याला प्रथम क्रमांक मिळवून दिला आहे, राष्ट्रीय नागरी संरक्षण महाविद्यालय नागपूर याठिकाणी महाराष्ट्र मधून हरेश्वर ठाकुर यांची दोन वेळा निवड झाली होंती. रायगड जिल्हा व्यतिरिक्त जालना, हिंगोली, औरंगाबाद, परभणी, रत्नागिरी इ. जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक म्हणून निवड झाली होंती,ज्या-ज्या ठिकाणी आपत्ती सारखे प्रसंग निर्माण झाले त्यावेळी त्या मदत कार्यात विशेष सहकार्य केले आहे. सावित्री नदी दुर्घटना महाड, व्हेल मासा रेवदंडा अलिबाग, जेएनपीटी पोर्ट मधील चित्रा-खलीजा बोट दुर्घटने मध्ये तसेच औदयोगिक दुर्घटना, रस्ते अपघात या प्रत्येक समयी नागरिकांचे जीव वाचविण्यात, मनोधैर्य टिकवून ठेवण्यात, मानसिक आधार देण्यात, प्रथमोचार इ. कार्यात विशेष कामगिरी पार पाडली आहे.हरेश्वर ठाकुर यांना रायगड भूषण पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email