डोंबिवली ; प्रवेश बंदी मोडणाऱ्या पोलिसांना शिवनलिनी प्रतिष्ठानने दिले `चॉकलेट ‘
डोंबिवली दि.११ – वाहतूक रस्ता सुरक्षा सप्ताहात वाहतुकीचे नियम आणि त्यामुळे वाहनचालकांना होणारा फायदा याची माहिती दिली जात आहे. मात्र वाहतूक नियमाचे पालन शहर पोलिस पळत नसल्याची वास्तविकता समोर आली आहे. अश्या पोलिसांना डोंबिवलीतील शिवनलिनी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी ‘ चॉकलेट ‘दिले. शिवनलिनी प्रतिष्ठानच्या वतीने डोंबिवली पूर्वेकडील आनंद बालभवन येथील चिपळूणकर पथावरील नो इंट्री मधील वाहनचालकांना ‘चॉकलेट देण्यात आले. यावेळी शिवनलिनी प्रतिष्ठान महाव्यवस्थापक अनिरुद्ध कुलकर्णी, कल्याण तालुका अध्यक्ष नितीन कोळी, शहर अध्यक्ष दत्ता वाठोरे,समाधान पवार, मिलिंद कांबळे, अमोल काकडे, जितेंद्र आमोलकर, श्रीधर सुर्वे,आधार सामाजिक संस्थेचे अमित दुखंडे उपस्थित होत.
त्यांंच्या या कामाचे कौतुक करत डोंबिवली वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक एस.एन.जाधव हेही सदर ठिकाणी आले. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना प्रतिष्ठान आणि जाधव यांनी `चॉकलेट ‘ देऊन वाहतूक नियमाचे पालन करा अशी विनंती केली.इतर ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याने जाधव आणि इतर कर्मचारी वर्गाला इतर ठिकाणची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी जावे लागले.त्यानंतर याच ठिकाणी मोटरसायकलीवरून हेल्मेट न घातला शहर पोलीस जात असताना त्यांना प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी थांबविले. नियमाचे पालन नागरिकांनी करावे तसे आपण करावे सांगून त्यांना चॉकलेट दिले. जिथे पोलीसच वाहतुकीचे नियम पाळत नसतील तिकडे सामान्य नागरिकांकडून काय अपेक्षा करावी असा प्रश्न यावेळी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्याना पडला.
Please follow and like us: