वस्तूंपेक्षा मुलांची जास्त काळजी घेण्याची गरज

{श्रीराम कांदू}

डोंबिवली दि.०९  :-  नागरिकांनी मुद्देमालापेक्षा आपल्या मुलांची जास्त काळजी घेण्याचे आवाहन ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी कल्याणमध्ये बोलताना केले. पोलीस आयुक्तालयाच्या पूर्व प्रादेशिक विभागातर्फे बुधवारी आयोजित केलेल्या मुद्देमाल हस्तांतरण सोहळ्यात ते बोलत होते. घरामध्ये अनेक व्यक्ती असतानाही चोरी होते ज्याची घरच्यांना अजिबात माहिती नसते. मात्र पोलिसांनी या चोरीचा छडा लावावा आणि आपला मुद्देमाल परत मिळवून द्यावा अशी लोकांची अपेक्षा असते.

हेही वाचा  :- Kalyan ; खुन्नशीतून चाकू हल्ला

हा मुद्देमाल परत मिळवणे आणि ओळख पटवून संबंधित व्यक्तीला परत करणे हा अत्यंत खडतर असा प्रवास आहे. घरातून चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळू शकतो. मात्र घरातून गेलेली व्यक्ती कधी कधी परत येऊ शकत नाही. त्यामूळे लोकांनी प्राणापेक्षा जास्त आपल्या मुलांची काळजी घेण्याचे आवाहन पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना केले.

 हेही वाचा :- डोंबिवलीच्या बत्तीगुलचा प्रश्न सुटणार ?

या कार्यक्रमात अपर पोलीस आयुक्तालय विभागातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत तब्बल 1 कोटी 17 लाख रुपयांचा ऐवज संबंधित लोकांना समारंभात सन्मानपूर्वक परत केला. ज्यामध्ये महागडे मोबाईल, दागिने, आलिशान गाड्या आदी वस्तूंचा समावेश होता. आपल्या गहाळ झालेल्या किंवा चोरीला गेलेल्या वस्तू परत मिळालेल्या पाहून संबंधित व्यक्तींच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावत नव्हता. यावेळी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उपायुक्त कल्याण विवेक पानसरे, उल्हासनगर प्रमोद शेवाळे, सहाय्यक आयुक्त अनिल पोवार, सर्व वरिष्ठ पोलिस निरीक्षक अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Hits: 1

Leave a Reply

Your email address will not be published.

RSS
Follow by Email