५० लाखांच्या खंडणी प्रकरणी छोटा राजनच्या पुतणीसह दोन साथीदारांवर खंडणीचा गुन्हा दाखल

पुणे दि.१४:- बांधकाम व्यावसायिकाकडे ५० लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात गुंड छोटा राजनची पुतणी व तिच्या दोन साथीदारांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे. धीरज साबळे (रा. धानोरे, ता. खेड, जि. पुणे), प्रियदर्शनी निकाळजे (रा. वानवडी) आणि मंदार वाईकर (रा.बिबवेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यातील साबळे याला रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे.

हेही वाचा :- Dombivali ; पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाने याप्रकरणी तक्रार दिली आहे. प्रियदर्शनी निकाळजे यांनी तक्रारदाराकडे ५० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. त्यावेळी त्याने दिलेल्या तक्रारीत निकाळजे यांनी २५ लाख रुपये स्वतःकडे तर २५ लाख रुपये संबंधित व्यावसायिकाची पत्नी, मेहुणी व मंदार यांना देणार असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा :- पैश्यांची मागणी केल्याने शौचालय चालकाला बदडले

शिवाय त्यावेळी निकाळजे यांनी त्याला पत्नीला घटस्फोट देण्यासही सांगितले. खंडणी दिली नाही तर पिस्तूलाच्या १० गोळ्या घालून मारून टाकण्याची धमकी दिली.मी छोटा राजनची पुतणी आहे. आमचे डीएनए एक आहेत. जीव प्यारा असेल तर सांगितलेले ऐक असे लेखी तक्रारीत त्यात म्हटले आहे.

हेही वाचा :- Kalyan ; रेडकू कापणाऱ्या तिघा कसायांवर गुन्हा

संबंधित व्यवसायिकाने पोलिसात धाव घेतल्यावर सापळा रचण्यात आला.त्यावेळी २५ लाख रुपयांची रक्कम स्वीकारण्यासाठी धीरज साबळे आला.तेव्हा त्याला पंचांसमोर पैशांची बॅग घेताना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने ताब्यात घेतले.

Hits: 17

Leave a Reply

Your email address will not be published.

RSS
Follow by Email