छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय वॉर्ड बॉय दारू पिऊन रुग्णालयाच्या आवारात पडल्याची घटना

काळव्याचं छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय अनेक कारणांनी गाजत असतानाच आता या रुग्णालयाचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. रुग्णालयाच्या अर्थो विभागात काम करणारा वॉर्ड बॉय दारू पिऊन रुग्णालयाच्या आवारात पडल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. रुग्णालयाच्या आवारातच हा तळीराम वॉर्ड बॉय पसरल्याने ररूग्णालयात येणाऱ्या लोकांसाठी हा चर्चेचा विषय बनला होता. कळवा येथे ठाणे महानगर पालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आहे. या रुग्णालयात रोज सुमारे दोन हजारांहून अधिक रुग्ण उपचारासाठी येतात.

हेही वाचा :- राजेंद्र काशिनाथ पंडित यांची पोस्ट… एका संघ स्वयंसेवकाच्या नजरेतून शिवसेनेचे राजकारण

त्यामुळे येथे लोकांची नेहमीच मोठी गर्दी असते. अशा गर्दीच्या वेळी बुधवारी सायंकाळी ५.०० च्या सुमारास नाथा नावाचा वॉर्ड बॉय रुग्णालयाच्या महत्वाच्या कागद पत्रासह दारूच्या नशेत पडल्याची घटना घडली. नाथा नावाचा हा वॉर्ड बॉय वॉर्ड क्रमांक ९ मध्ये ऑर्थो विभागात काम करत असल्याचे कळते. या वॉर्डात असल्या डॉक्टरांनी त्याच्याकडे महत्वाच्या कागदपत्रांची फाईल दिली होती.

हेही वाचा :- सत्तेसाठी सर्वच पक्ष एकमेकांच्या मागे; मात्र मनसेचे थांबा आणि वाट पाहा

मात्र त्याने ती संबंधित विभागात न पोहचविता दारूच्या नशेत रुग्णालयाच्या आवारात असलेल्या हिरवळीवर झोपी गेला. रुग्णालयाच्या गणवेशावरच तो पसरलेला असल्याने तसेच त्याच्या जवळच कागद पत्रांची फाईल पडली असल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी हा चर्चेचा विषय झाला होता. रुग्णालयाच्या आवारात गस्त घालत असताना सुरक्षा रक्षकांना हे दृश्य दिसले. त्यांनी तात्काळ रुग्णालय प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली असता प्रशासनाने त्याला रात्री ११ च्या सुमारास पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याचे रक्त तापसणीकरिता काढून घेण्यात आले असून त्याचा अहवाल आल्यानंतर त्याच्यावर कारवाई होणार असल्याचे समजते.

Hits: 0

Leave a Reply

Your email address will not be published.

RSS
Follow by Email