छत्रपति शिवाजी महाराज रुग्णालयात प्रसूतीदरम्यान बँडेज पोटातच ठेवले

ठाणे . ऐनकेन प्रकारे नियमितपणे चर्चेत असलेल्या ठामपाच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये एक विचित्र प्रकार उघडकीस आला आहे. प्रसूतीदरम्यान एका महिलेच्या जननमार्गातच बँडेज ठेऊन त्यावर टाके घालण्याचा प्रताप या रुग्णालयाच्या डॉक्टरांनी केला आहे.

निशा सूरज राजभर ( 20, रा. लोकमान्य नगर) असे या महिलेचे नाव आहे. 4 मे रोजी प्रसूतीसाठी ती ठामपाच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये दाखल झाली होती. 5 मे रोजी ती प्रसूत झाली. मात्र, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने येथे कार्यरत असणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांनी तिच्या जननांगामध्ये रक्त थांबवण्यासाठी बँडेज ठेवले. मात्र, टाके घालताना हे बँडेज काढण्यातच आले नाही. त्याच अवस्थेत चार दिवसांनी दिला रुग्णालयातून सोडण्यात आले. घरी गेल्यानंतर तिच्या पोटात वेदना होऊ लागल्याने निशा राजभर हिला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे गेल्यानंतर सदरचा प्रकार उघडकीस आला. ही बाब मनसेच्या महिला विभागाध्यक्षा समीशा मार्कंडे यांना समजताच त्यांनी सदर महिलेची भेट घेऊन तिच्यासह शिवाजी रुग्णालय गाठले. या महिलेला आता पुन्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. तर, या महिलेची प्रसूती करणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍याचे नाव अद्याप समजले नसून त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मार्कंडे यांनी केली आहे.

Sources – ABI News

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email