तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा; पोलिसासह १८ जणांवर गुन्हा दाखल
सोलापूर – येथील शहरानंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागातही करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीतही गावात सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून वाढदिवसाचा केक तलवारीने कापून जल्लोष करण्याचा प्रकार करमाळा तालुक्यात घडला.
आश्चर्य म्हणजे या बेजबाबदार कृत्यामध्ये एका पोलीस कर्मचा-याचाही सहभाग होता.
या पोलिसासह १८ जणांविरूध्द करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणी विकास ननवरे आणि सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचारी विनायक काळे यांच्यासह अंबादास राऊत, हणमंत पवार, गोरख काळे, योगीराज काळे, बबल्या पवार, नागेश काळे, सचिन काळे, संतोष काळे, नाना काळे, सोमनाथ काळे आदी १८ जणांना आरोपी करण्यात आले आहे.
Please follow and like us: