डोंबिवलीत प्रथमच कँसर निदान केंद्र सुरू
{श्रीराम कांदु}
डोंबिवली दि.०९ :- समाजात कँसरबाबत भयगंड दूर करण्यासाठी डोंबिवलीत प्रथमच माफक दरात कँसर निदान केंद्र सह्रदय चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून सुरु करण्यात आले. डोंबिवली येथील गांधी नगर येथील स्व. आनंद दिघे सभागृहात या केंद्राचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी जागतिक मल्याळी परिषदेचे मुंबई विभागाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे के. के. नंबियार, पालिकेच्या ग प्रभाग समितीच्या सभापती दिपाली पाटील, फाऊंडेशनचे अध्यक्ष पॉल परापल्ली, डॉ. ओमेन डेव्हिड, डॉ. बिजाय कुट्टी, डॉ. रोहन कुष्णकुमार, पी. एन. सुरेश, डॉ. सुनील कुट्टी, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा :- Dombivali ; शहरातील सामाजिक संस्थांनी मैदानांची जपणूक करावी – महापौर विनिता राणे
प्रमुख पाहुणे नंबियार म्हणाले, मी कँसरमधून धैर्याने बाहेर पडलो. मी दररोज चालतो. कित्येक किलोमीटरच्या मरेथॉनमध्ये सहभागी होतो. कँसर म्हणजे शेवट नाही. बाजरीची भाकरी हा पोषक आहार आहे. तर डॉ. बिजाय कुट्टी म्हणाले, येत्या काही वर्षात भारतात कँसरचे रुग्ण १२ लाखावर जाण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. कँसर बाबत उपचार केंद्र आपल्या घराजवळ असण्याची गरज आहे. सह्रदय फाऊंडेशन कँसर निदानासाठी महत्त्वाची भूमिका निभावेल, अशी मला वाटते. डोंबिवली शहरात अश्या केंद्राची गरज होती ती पुर्ण होत आहे. सह्रदय फाऊंडेशनचे उपाध्यक्ष ओमेन डेव्हिड म्हणाले, येत्या तीन वर्षात टिटवाळा येथील कँसर रुग्णालय तयार होईल.
हेही वाचा :- फर्नीचरच्या शोरूम मध्ये घुसला भलामोठा अजगर कामगारांसह ग्राहकांची पळापळ
डोंबिवलीत कुणीही भुकेपासून वंचित राहु नये याकरिता फाऊंडेशनच्यावतीने मोहिम सुरु केली आहे. त्याचा फायदा सामन्य माणसाला होत आहे. कँसर म्हणजे मरण हा सामन्य माणसातला समज दूर करायचा आहे. यासाठी अनेक शिबिरे आणि जाणीव जागृती शिबिरांचे आयोजन केले. पहिल्या टप्यात किंवा दुसऱ्या टप्यातला कँसर बरा होतो. परंतु याबाबत भयगंड दूर करुन निदान करुन घेतले पाहिजे. मुंबई सारख्या मोठ्या शहरातील रुग्णालयात कँसर निदान प्रवेश देखील मिळत नाही. त्यासाठी डोंबिवली सारख्या उपनगरात केंद्र सुरु करण्यात येत आहे. या केंद्रासाठी महापालिकेच्यावतीने जी काय मदत लागेल ती करण्यास सभापती दिपाली पाटील करणार असल्याचे डेव्हिड यांनी शेवटी बोलताना सांगितले.
Hits: 174