पुरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन.

(विठ्ठल ममताबादे)

उरण दि.10 – महाराष्ट्रात काही भागात भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सांगली, सातारा, कोल्हापुर जिल्ह्यात पूरामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तेथील नागरिक अन्न वस्त्र निवारा यासारख्या मूलभूत सुविधा पासून वंचित आहेत. पूरामध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात येत आहे.

हेही वाचा :- डोंबिवली रेल्वे स्थानकातील पूर्वेच्या दिशेचा सरकता जिना पुनः बंद बंद पडण्याची परंपरा चालूच

अश्या अडचणीत असलेल्या नागरिकांसाठी महाराष्ट्रातील अनेक स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था, संघटना मदतीसाठी पुढे आले असून उरण मधील उरणकर ढोल ताशा ध्वज पथक ट्रस्ट आणि वुमेन ऑफ विसडम शैक्षणिक आणि सामाजिक संस्था, उरण यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील पुरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी मदतीचे प्रयत्न सुरु असून या नागरिकांना फरसाण, बिस्कीट, कपडे, चादर, बेडशीट, पाणी, मेडिकल किट, दूध, पावडर, मेणबत्त्या, माचीस आदि जीवनावश्यक वस्तू तसेच आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ‘मी उरणकर ढोल ताशा ध्वज पथक ट्रस्ट’ उरण आणि वुमेन ऑफ विसडम शैक्षणिक आणि सामाजिक संस्था, उरणचे पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावे.

विशाल पाटेकर-9920484545, वैष्णव ठाकुर-8419936035,

अक्षु शिंदे-9769880139, निखिल म्हात्रे – 9870703901,

बादल म्हात्रे-8097245005, सारिका पाटील -9664979696

बरसात से ठाणे जिले भर में जीवन अस्त व्यस्त, खतरा अभी टला नही.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email