37.2 लाख मनुष्य दिवसांच्या थेट रोजगार निर्मितीला मदत
नवी दिल्ली, दि.०७ – केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थ विषयक समितीने पश्चिम बंगालमधल्या नारायणगड आणि ओदिशातल्या भद्रक दरम्यानच्या 155 किमीच्या तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या निर्मितीला मान्यता दिली आहे. यासाठी, 1,866.31कोटी रुपये खर्च येणार असून 2023-24 पर्यंत हा मार्ग पूर्ण होईल.यामुळे सध्याच्या आणि अतिरिक्त वाहतुकीला तोंड देण्याची क्षमता निर्माण होणार आहे. नारायणगड आणि भद्रक या मार्गाचा,पोलाद प्रकल्पांना कोकिंग कोळसा पुरवण्यासाठी वापर केला जातो.
हेही वाचा :- औष्णिक ऊर्जा प्रकल्प समस्यांच्या त्वरित निराकरणासाठी उच्चस्तरीय प्रोत्साहन
त्याचबरोबर चक्रधरपूर भागातून निर्यातीसाठीच्या कच्च्या धातूची विविध बंदरासाठी वाहतूक करण्यासाठी या मार्गाचा वापर केला जातो. तिसऱ्या मार्गामुळे कोळश्याची वाहतूक सुलभ होणार आहे. याचा पोलाद उद्योग,उर्जा प्रकल्प आणि निर्यात उद्योगालाही लाभ होणार आहे.यातून ओदिशा आणि पश्चिम बंगालच्या अर्थव्यवस्थेला आणि संपूर्ण पूर्व भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. तिसऱ्या मार्गामुळे या मार्गावरचा वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. बांधकामाच्या काळात 37.2 लाख मनुष्य दिवसांच्या थेट रोजगार निर्मितीला मदत होणार असून अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीचीही क्षमता यात आहे.