कायदा आणि न्याय क्षेत्रात सहकार्य आणि संयुक्त सल्लागार समिती स्थापन करण्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी
कायदा आणि न्याय क्षेत्रात सहकार्य आणि संयुक्त सल्लागार समिती स्थापन करण्यासाठी भारत आणि ब्रिटन दरम्यान सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली, दि.०५ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज कायदा आणि न्याय क्षेत्रात सहकार्य आणि संयुक्त सल्लागार समिती स्थापन करण्यासंदर्भातील भारत आणि ब्रिटन दरम्यानच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करायला मंजुरी दिली आहे.
विविध न्यायालयांमध्ये तक्रारींच्या निवारणासाठी प्रभावी कायदेशीर यंत्रणा, कायदा तज्ञ, सरकारी पदाधिकारी यांच्या अनुभवांचे अदान-प्रदान आणि त्यांचे प्रशिक्षण याबाबतच्या समस्या आणि गरजा यांची दखल या करारात घेण्यात आली आहे. तसेच संयुक्त सल्लागार समिती स्थापन करण्याची सुचनाही या करारात करण्यात आली आहे.
Please follow and like us: