मुंबईतील सुरक्षा अपिलात न्यायाधीकरणात तंत्रज्ञ सदस्याचे नवे पद निर्माण करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली, दि.०७ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईतल्या सुरक्षा अपिलीय न्यायाधीकरणात तंत्रज्ञ सदस्याचे नवे पद निर्माण करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारमधील सचिवाच्या दर्जाचे हे पद असेल आणि त्यांना 2,25,000/-(निश्चित) वेतन अथवा सातव्या आयोगानुसार 17 व्या श्रेणीचे वेतन मंजूर करण्यात आले आहे.
हेही वाचा :- ठाणे जिल्हा परिषदेच्या अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदी ब.भि.नेमाने
लाभ: या नव्या पदामुळे मुंबईत सुरक्षा अपिलीय न्यायाधीकरण एसएटी चे नवे पीठ सुरु करता येणार आहे. या पीठामुळे, सेबी, शेअर बाजार नियामक संस्था, इर्डा ही आयुर्विमा नियामक संस्था आणि फ्रेडा हे निवृत्तीवेतन नियमक आणि विकास प्राधिकरण या सगळ्यांसमोर असलेली आर्थिक प्रकरणे आणि अपील जलदगतीने निकाली काढण्यात येतील. शेअरबाजार आणि विमाक्षेत्र झपाट्याने वाढत असतांना त्यांच्याशी संबंधित तक्रारी आणि खटले देखील वाढत आहेत. या तक्रारींचे निवारण करण्यासाठी हे नवे पद उपयुक्त ठरेल.