लग्नाचे आमिष व वडील आजारी असल्याचे कारण देत तरुणीला पावणे सात लाखांना गंडवले

हॉटेल मधील भेटीचे फोटो दाखवत बदनामी करण्याची दिली धमकी

कल्याण : लग्नाचे आमिष तसेच वडील आजारी असल्याचा बहाणा देत एका तरुणीकडून तब्बल सहा लाख ८६ लाख रुपये उकळल्याची घटना कल्याण मध्ये उघडकीस आली आहे .दरम्यान या इसमाने या तरुणीला हॉटेल मध्ये नेत तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला व हॉटेल मधील भेटीचे फोटो व्हायरल करत बदनामी करण्याची धमकी देखील दिली होती .अखेर या जाचाला कंटाळून या पिडीत तरुणीने या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलीसनी शुभाकर बनर्जी विरोधात गुन्हा दखल करत पुढील तपास सुरु केला आहे

    सदर पिडीत तरुणी कल्याण पश्चिम येथील संतोषी माता रोड परिसरात राहते वर्ष भरा पूर्वी तिची शुभाकर बनर्जी सोबत ओळख झाली .शुभाकर याने तिला लग्नाचे आमिष दाखवत तसेच आपले वडील आजारी असल्याचा बहाणा करत तिच्याकडून तब्बल ६ लाख ८६ हजार रुपये उकळले होते त्यांनंतर त्याने तिला एका हॉटेल मध्ये बोलावून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला मात्र तिने प्रतिकार करताच त्याने तिला हॉटेल मधील भेटीचे फोटो दाखवत व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिली .याबाबत सदर पिडीत तरुणीने महत्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी शुभाकर बनर्जी विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email