कल्याणात घरफोडी
कल्याण दि.३० – कल्याण पूर्व सूचक नाका महात्मा फुले परिसरात राहणारे इसम घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेले होते. काल रात्रीच्या सुमारास घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या बाथरूमच्या खिडकीचे ग्रील उचकटून घरात प्रवेश करत घरातील सोन्याचे दागिने व रोकड असे मिळून एकूण ५७ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी त्यांनी कोलशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
हेही वाचा :- डोंबिवलीत गॅस वितरकांची दादागिरी, गॅस पुरवठा खंडित करण्याची धमकी
दुसरी घटनेत नेतीवली पोलीस चौकीच्या मागील बाजूस असलेल्या धर्मा वक्ते याचे कपड्याचे दुकान आहे. काल रात्रीच्या सुमारास ते दुकान बंद करून निघून गेले असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या दुकानाचे शटर उचकटून एकूण ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. काल सकाळी दुकान उघडल्यानंतरत्यांना दुकानात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी या प्रकरणी टिळक नगर पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनि अज्ञात चोरट्या विरोधत गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.