बुलेट चोर अल्पवयीन आरोपी २४ तासांत गजाआड दोन बुलेट हस्तगत
{श्रीराम कांदु}
कल्याण दि.०६ :- डोंबिवलीच्या विविध भागांतून रॉयल इनफिल्ड कंपनीच्या ३५० क्लासिक बुलेट चोरीला जाण्याचे प्रकार वाढले होते. या पार्श्वभूमीवर हौस-मौज करण्यासाठी लागणारा पैसा जमवण्यासाठी महागड्या बुलेट चोरणाऱ्या एका अल्पवयीन चोरट्याला कल्याण क्राईम ब्रँचने २४ तासाच्या आत ताब्यात घेतले आहे. या चोरट्याकडून चोरलेल्या दोन बुलेट हस्तगत करण्यात क्राईम ब्रँचला यश आले आहे.
हेही वाचा :- Narendra Modi यांच्या ‘संन्यासा’च्या घोषणेनंतर राज ठाकरेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत!
बुलेट चोरीच्या घटना वाढल्याने पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी सखोल तपास करून लवकरात लवकर गुन्हे उघडकीस आणण्याचे फर्मान सोडले होते. डोंबिवली आणि विष्णूनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात चोरटा रॉयल इनफिल्ड कंपनीची ३५० क्लासिक बुलेट चोरून पसार झाला होता. याबाबत विष्णूनगर आणि डोंबिवली पोलिस ठाण्यात मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल केले होते. सदर गुन्ह्याचा समांतर तपास कल्याण क्राईम ब्रँचकडून करण्यात येत होता. क्राईम ब्रँचच्या कल्याण युनीटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजू जॉन यांनी २४ तासांच्या आत गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढली.
हेही वाचा :- प्रदूषण नियंत्रण मंडळाला कुणी घर देता का घर ?
त्यानुसार वपोनि जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार नितीन मुदगुन, हवालदार राजेंद्र घोलप, दत्ताराम भोसले, राजेंद्र खिलारे, विश्वास चव्हाण, प्रकाश पाटील, हरिश्चंद्र बंगारा, राहूल ईशी यांनी प्रथम संशयित चोरट्याचे नाव निष्पन्न करून त्याचा शोध घेतला. त्यानंतर मात्र गुन्ह्यांतील चोरीस गेलेल्या 2 बुलेट हस्तगत करून अटक केलेल्या चोरट्याकडून 2 गुन्हे उघडकीस आणले. या गुन्ह्याचा तपास विष्णूनगर पोलीस ठाणे हे करित असल्याने सदर गुन्हयातील मुद्देमाल व अल्पवयीन आरोपीला विष्णूनगर पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे